तो, तेरेको मार देंगे’ म्हणत मालवाहू वाहनातून ३.५८ लाख लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा
By प्रदीप भाकरे | Updated: January 27, 2024 14:15 IST2024-01-27T14:14:56+5:302024-01-27T14:15:21+5:30
गुरूवार रात्रीची घटना : विनाक्रमांकाचे वाहन आडवे लावून वाटमारी

तो, तेरेको मार देंगे’ म्हणत मालवाहू वाहनातून ३.५८ लाख लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा
अमरावती: अज्ञात चौघांनी मालवाहू वाहन लुटले. त्यातील सुमारे ३.५८ लाख रुपये किमतीचे साहित्य घेऊन आरोपींनी पळ काढला. नवी वस्ती बडनेरा येथील नगिना मशिदिजवळ २५ जानेवारी रोजी रात्री ११.१० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, ऑटचालक शेख चांद शेख हसन (३९, गवळीपुरा) यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी चार आरोपींविरूध्द जबरी वाटमारीचा गुन्हा दाखल केला.
शेख चांद शेख हसन हे २५ जानेवारी रोजी आपल्या मालवाहू ऑटोत माल घेऊन शिवाजी चौक येथून नगिना मशिदीजवळून जात असताना रात्री ११.१० च्या सुमारास अनोळखी चार इसमांनी त्यांच्या ऑटोसमोर विनाक्रमांकाचे चारचाकी वाहन लावले. त्यामुळे शेख चांद शेख हसन यांनी ऑटो थांबविला. त्यावेळी ३० ते ४० वर्षे वयोगटातील चार जण तोंडाला रूमाल बांधून बाहेर आले. ‘तेरे ऑटो मे जो माल है, उसे खाली कर, नही तो तेरेको मार देंगे, अशी धमकी त्यांनी दिली. त्यावर शेख चांदने नकार दिला आरोपींनी जबरदस्तीने त्याच्या ऑटोतील ९२० पॅकेटस तंबाखू, १४८८ पॅकेट, १५०० पॅकेटस सोप, १००० पॅकेटस मुखवास व १२०० पॅकेटस ब्रिस्टाल सिगारेट माल त्यांच्या वाहनात भरला. तथा ते तेथून पसार झाले.
ऑटोचालकाची घाबरगुंडी
अचानक घडलेल्या या घटनेने शेख चांद घाबरले. त्यामुळे त्यांनी आरोपींचा पाठलाग केला नाही. किंवा फारशी आरडाओरड देखील केली नाही. घरी गेल्यानंतर त्यांची मनस्थिती देखील बिघडली. मात्र, त्यानंतर त्यांनी २६ जानेवारी रोजी रात्री बडनेरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी रात्री १०.४१ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.