इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 12:42 PM2024-07-13T12:42:02+5:302024-07-13T12:43:09+5:30

Amravati : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

36 Gram Panchayats will get funds for building construction | इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी

36 Gram Panchayats will get funds for building construction

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२, तर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत मेळघाटातील १६ अशा दोन्ही मिळून ३६ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, या निधीतून या ग्रामपंचायतीला हक्काचे कार्यालय उपलब्ध होणार आहे.


ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही, जुन्या इमारतीची पडझड झाली आहे, ३६ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आतापर्यंत झेडपी प्रशासनाकडे मेळघाटातील २४ व गैरआदिवासी भागातील १२, अशा ३६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आले होते. या प्रस्तावाला मंजुरी मिळून त इमारत बांधकामासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातील १६ ग्रा.प. वगळता अन्य १२ ग्रामपंचायतींना २० ते २५ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.


२५,००,००० रुपये इमारतींसाठी निधी ग्रामपंचायतींना ज्या गावांची लोकसंख्या २ हजारावर आहे तेथे इमारत बांधकामासाठी २५ २ हजारापेक्षा कमी लाखाचा काना २० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.


कार्यालये होणार चकाचक
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत मोर्शी तालुक्यातील २, वरूडमधील २, अचलपूर ३, चांदुर बाजार १, अंजनगाव सुजी १. दर्यापूर १, धारणी २, तर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून धारणी तालुक्यातील ८ आणि चिखलदरा तालुक्यातील १६ अशा एकूण ३६ ग्रामपंचायतींचे कार्यालय चकाचक होणार आहेत.


"बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत १२ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळाला आहे तर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानामधून मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यात १६ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतींना हक्काचे कार्यालय उपलब्ध होईल."
- बालासाहेब बायस, डेप्युटी सीईओ पंचायत


कोणत्या ग्रामपंचायतींना मिळणार निधी
मोर्शी-पार्टी, अंबाडा, वरूड- चिंचरगव्हाण, इसंबी, चांदुर बाजार, राजना, पूर्णा, अचलपूर-गौरखेड कुंभी, घोडगाव, देवमाळी, अंजनगाव सुजी तालुक्यातील विहिगाव, दर्यापूरमधील सामदा, धारणीमधील चाकर्दा, दिया, चटवाबोड, धुळघाटरोड, राजपूर, राणापिसा, रत्नापूर, मांडवा, काकरम, दादरा आणि चिखलदरा तालुक्यातील आकी, भुलोरी, बोरारा, सोमठाणा खु, बदनापूर, बागलिंगा, बामादेही, गडमाभांडूम, मेहरीआम, आवागड, राहू, चिंचखेडा, कोहाना, खडीमल, अंबापाटी, अढाव आदी ग्रामपंचायतींना निधी मिळणार आहे.

 

Web Title: 36 Gram Panchayats will get funds for building construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.