‘कृषी’च्या ३६ कार्यालयांना नाही हक्काची इमारत; दरमहा ५.८६ लाख रुपये कार्यालयाच्या भाड्यासाठी शासनाला भुर्दंड

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 19, 2023 04:03 PM2023-05-19T16:03:10+5:302023-05-19T16:03:30+5:30

१६ तालुक्यांमध्ये पेरणीकाळात महत्त्वाचे असणारे तालुका बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे.

36 offices of Krishi have no right building; 5.86 lakh per month to the government for office rent in amravati | ‘कृषी’च्या ३६ कार्यालयांना नाही हक्काची इमारत; दरमहा ५.८६ लाख रुपये कार्यालयाच्या भाड्यासाठी शासनाला भुर्दंड

‘कृषी’च्या ३६ कार्यालयांना नाही हक्काची इमारत; दरमहा ५.८६ लाख रुपये कार्यालयाच्या भाड्यासाठी शासनाला भुर्दंड

googlenewsNext

अमरावती: सरकार कोणतेही असले तरी शेतकरी अन् कृषी विभाग दुर्लक्षितच राहिला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांवर रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला असतानाच पश्चिम विदर्भात पाच जिल्ह्यातील तब्बल ३६ कृषी कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतीमधून सुरू आहे. यासाठी दरमहा ५,८५,७२८ रुपयांचे इमारत भाडे शासनाला द्यावे लागत आहे.

पश्चिम विदर्भात ५६ तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यात एक तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एक तालुका बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय, एक तालुका फळरोपवाटिका प्रक्षेत्र कार्यालय अशी स्वतंत्र कार्यालये आहेत. यामध्ये विभागातील २० तालुक्यात महत्त्वाचे असणारे तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अद्यापही स्वत:ची हक्काची इमारतच नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

याशिवाय १६ तालुक्यांमध्ये पेरणीकाळात महत्त्वाचे असणारे तालुका बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. तसेच फलोत्पादनाचे क्षेत्रवाढीसाठी महत्त्वाची भूमिका असणारे नऊ तालुका/जिल्हा फळरोप वाटिका प्रक्षेत्र कार्यालये ही भाड्याच्या जागेत आहेत.

Web Title: 36 offices of Krishi have no right building; 5.86 lakh per month to the government for office rent in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.