३७४ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:10 PM2018-04-07T22:10:59+5:302018-04-07T22:10:59+5:30

गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे.

374 villages thirsty | ३७४ गावे तहानलेली

३७४ गावे तहानलेली

Next
ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा परिणाम : ३८६ उपाययोजना, १३.६० कोटींची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे. यासाठी शासनाने ३८६ उपाययोजनांना प्रशासनाला मंजुरी दिलेली आहे. यावर १३ कोटी ६० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ तीन टप्प्यातील कृती आराखड्यात १,४२८ गावांसाठी १,७४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. यासाठी १७ कोटी ९९ लाख ९६ हजारांच्या निधीची आवश्कता आहे. उन्हाळ्याच्या भीषणतेच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने ३७४ गावांतील उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ नवीन ७० विंधन विहिरी व ४१ कुपनलिका अशा एकूण ११ कामांना मंजुरात देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा नवीन ४५ विंधन विहिरी व १९ कुपनलिका अशी एकूण ६४ कामे पूर्ण केलेली आहेत, तर ४७ कामे प्रगतीपथावर आहेत.
जिल्हा परिषदेअंतर्गत १०१ नळ योजनांच्या विशेष दुरूस्ती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील ७७ अशा एकूण १७८ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या ३२ नळ योजनांतर्गत विशेष दुरूस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या ४८ कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. ९ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहे व उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत आहे. सद्यस्थितीत ४३ गावांमध्ये ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत नसला तरी सोमवारपासून चिखलदरा तालुक्यात पस्तलाई व भांद्री या गावांसाठी दोन टँकर सुरू करण्याचे आदेशित आहे.

या उपाय योजनांना मंजुरी

सद्यस्थितीत ३७४ गावातील २८६ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली . यामध्ये १०५ गावात १११ विंधन विहीरी व कुपनलिका करण्यात येणार आहे . यावर १.०९ कोटी, १७८ गावात १७८ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येईल यासाठी ९.८० कोटी, ४८ गावात ४८ तात्पुरत्या पुरक नळ योजना यावर २.४१ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणायत आले यावर ३० लाख, असे १३.६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

१३९ गावात १५१ उपाययोजना सुरू
सद्यस्थितीत १३९ गावात १५९ उपाययोजना सुरू आहेत. यावर ३.१९ कोटींचा खर्च होणार आहे. यामध्ये ४१ गावार ४७ विंधन विहीरी, कुपनलिकांची कामे सुरू आहेत, यासाठी ५१ लाख, ३२ गावात ३२ नळ योजनांची विशेष दुरूस्ती सुरू आहे,यासाठी १.२३ कोटी, २३ गावात तात्पुरत्या पुरक नळ योजनांची कामे सुरू आहेत, यासाठी १.१५ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. यासाठी ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.

 

Web Title: 374 villages thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.