गेल्या सहा वर्षांत केली ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या

By admin | Published: January 13, 2015 10:53 PM2015-01-13T22:53:18+5:302015-01-13T22:53:18+5:30

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि १२० योजनांच्या अधिभाराने माणसीक तणावात आहे. मागील सहा वर्षात विदर्भातील ४० ग्रामसेवकांनी

40 gramsevaks committed suicide in last six years | गेल्या सहा वर्षांत केली ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या

गेल्या सहा वर्षांत केली ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या

Next

मोहन राऊ त - धामणगाव रेल्वे
ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि १२० योजनांच्या अधिभाराने माणसीक तणावात आहे. मागील सहा वर्षात विदर्भातील ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्यानंतर ४८ जनांवर केवळ आकसापोटी प्रााणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़ नवीन सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षा या ग्रामसेवकांनी व्यक्त केली आहे़
अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या पाच जिल्ह्यात ३ हजार १३० तर नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यात ४ हजार २२४ ग्रामसेवक कार्यरत आहे़ या विदर्भातील गावाच्या विकासात ग्रामसेवकांचा मोठा मोलाचा वाटा असतो. घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यापासून तर गावातील स्वच्छता, आरोग्य, ग्रामसभा घेणे असे विविध कामे ग्रामसेवकांना सांभाळावी लागतात. मात्र, एकाच ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा अधीभार असल्यामुळे या ग्रामसेवकाला अधीक मानसिक व शारीरिक ताण दररोज सहन करावा लागतो़ पूर्वी गावातील मोजकी कामे या ग्रामसेवकाकडे होती़ आता तब्बल केंद्र व राज्य शासनाच्या १२० योजनांची ग्रामीण स्तरावरील योजनांची माहिती तसेच पाठपुरावा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर आली आहेत़ दररोज मंत्रालयातून निघालेला शासकीय अध्यादेश जि़प़ व पंचायत समितीपर्यंत पोहोचताच त्याच दिवशी माहिती मागण्याचे कार्य वरिष्ठ स्तरावरून होत असल्याने ग्रामसेवकांना अडचणीला सामोरे जावे लागते़
ग्रामसेवक तांत्रिक दृष्टीने नसताना त्यांच्याकडून ग्रामस्तरावर बांधकाम करून घेतल्या जाते़ पूर्वी ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीत कामाचा ठराव घेऊन वरिष्ठ विभागाला पाठविण्याचे काम होते़ परंतु आता थेट महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसारख्या कामाची जबाबदारी ग्रामसेवकावर आली आहे़ एकीकडे गावात दोन गटात निर्माण होणारे तंटे तर दुसरीकडे बांधकाम सारखा विभाग ग्रामसेवकाकडे दिल्याने ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याची आपली कैफियत ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे व तालुकाध्यक्ष नरेंद्र चौधरी तसेच जयंत खैर यांनी मांडली़
जिल्ह्यातील १८ ग्रामसेवक सेवा निवृत्त होऊनही त्यांना निवृत्ती वेतन अद्यापही मिळत नाही़ जिल्हा परिषद हा विभाग ग्रामसेवक ज्या गावातून सेवा निवृत्त झाला त्या गावातील कामाचे नाहरकत प्रमाणपत्र मागते़ सदर प्रमाणपत्र देण्यास पंचायत समिती अनेक महिने लावत असल्यामुळे या सेवा निवृत्त ग्रामसेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येत असल्याचे युनियनचे विभागीय उपाध्यक्ष बबन कोल्हे यांनी सांगीतले़ दरवेळी शासनाकडे अनेक मागण्या ठेवल्या असता केवळ एकच मागणी पूर्ण करण्यात येते़ ग्रामविकासासाठी कोणताही भेदभाव न करता आपले कार्य जोमाने करणारा ग्रामसेवकाला कोणतेही संरक्षण नाही़ गावातील राजकीय पुढाऱ्यांनी खोटी तक्रार केली तरी वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात येते़ कोणताही ठोस पुरावा नसताना ग्रामसेवकाला निलंबित करण्यात येत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ असे जिल्हा युनियनचे विलास बिरे यांनी आपले मत व्यक्त केले़
एक ते दोन हजार लोकसंख्येच्या मागे एका ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते़ १५ हजार लोकसंख्येच्या गावासाठी ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात येत।. आज प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती सोबत वेतन श्रेणी मिळते, परंतु राज्यातील एकमेव ग्रामविस्तार अधिकाऱ्यांचे हे पद आहे़ ११० ग्रामविकास अधिकारी आजही वेतन श्रेणीपासून वंचित आहे़

Web Title: 40 gramsevaks committed suicide in last six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.