४० अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना ३८ सापडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:42+5:302021-07-29T04:12:42+5:30

असाईनमेंट पान २ मस्ट अमरावती : यंदाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये ४० मुली पळून गेल्या असल्या तरी त्यातील ३८ मुली ...

40 minor girls fled; Police found 38 | ४० अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना ३८ सापडल्या

४० अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना ३८ सापडल्या

Next

असाईनमेंट पान २ मस्ट

अमरावती : यंदाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये ४० मुली पळून गेल्या असल्या तरी त्यातील ३८ मुली शोधण्यात शहर पोलिसांना यश आले. मात्र, तीन वर्षांत किती मुली परत आणल्या गेल्या, ते अनुत्तरित आहे.

सोशल मीडियामुळे आता कुणालाही सहज व्यक्त होता येते. हे साधन अल्पवयीन, वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी अतिशय धोक्याचे ठरत आहे. पूर्वी व्यक्त होण्याकरिता इतकी सहजता नव्हती. त्यामुळे शारीरिक बदल घडत असतानाही मुला-मुलींमध्ये आकर्षण तुलनेत आजच्या प्रमाणात नव्हते. यामुळेच हल्ली अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत.

शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे भिन्न व्यक्तीबद्दल आकर्षण वाढते, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा काळात आई-वडिलांनी मुला-मुलीसोबत मैत्रीचे संबंध ठेवून त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. दुर्दैवाने पालकांकडेही मुलांसाठी पुरेसा वेळ राहत नाही. यातून मुली आकर्षणाला प्रेम समजून जोखीम घेतात. यातूनच त्यांची फसगत होते.

मुली चुकतात कुठे?

उदाहरण १

शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून मुली त्यावर भाळतात. त्यांच्या या भावनिकतेचा फायदा घेऊन फसवणूक केली जाते. तोपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेलेले असते.

उदाहरण २

केवळ निखळ मैत्री ठेवणेही अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. मुलाने चुकीचा अर्थ काढून तिच्यावर दबाव निर्माण केला. बदनामीच्या भीतीने निर्णय घ्यावा लागतो.

उदाहरण ३

स्वत:हूनच घरातून पळून जाण्यासाठी मुलाला आत्महत्येच्या धमक्या दिल्या. त्याच्यासोबत पळून गेली. नंतर संसाराच्या वास्तविकतेची जाणीव झाल्यावर फूस लावून पळविल्याचा आरोप करण्यात आला.

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०१८ : ७२

२०१९ : १०५

२०२० : ५९

२०२१ : ४०

मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र !

आई-वडील व्यस्ततेमुळे किशोरवयीन मुला-मुलींची भावना समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे एकाकीपण वाढतो.

मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी घरात तितके जवळचे कुणी नसल्याने मुले-मुली बाहेर शोध घेतात. यातून भावनिक जवळीकता वाढत जाते. शारीरिक बदलाने आकर्षणाची भर पडते.

Web Title: 40 minor girls fled; Police found 38

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.