शहरात ४० मिनिटे मान्सूपूर्व मृगसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:52+5:302021-06-11T04:09:52+5:30
अमरावती : अमरावती शहरात गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास तासभर मृगधारा बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. अंगाची काहिली ...
अमरावती : अमरावती शहरात गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास तासभर मृगधारा बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. अंगाची काहिली करणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहरात रहाटगाव, अर्जुननगर भागापासून पावसाला सुरुवात झाली. नंतर संपूर्ण शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस ४० मिनिटांपर्यंत पडला. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच दमदार पाऊस आहे. आता आठ दिवस जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
उत्तर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात ४.५ ते ६ किमी उंचीवर असलेले चक्राकार वारे, बंगालच्या उपसागरात आणि ओडिशा ते गुजरात तसेच महाराष्ट्र किणारपट्टीवर असलेली कमी दाबाची द्रोणीय स्थिती यामुळे येत्या आठवडाभर विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता असल्याची माहिती अनिल बंड यांनी दिली. यात १० ते १४ जून विदर्भात सार्वत्रिक पाऊस, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस राहील. याशिवाय ११ ते, १३ जून दरम्यान नागपूरसह पूर्वविदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, एकदोन ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच पश्चिम विदर्भात गडगडाटासह पाऊस राहणार असल्याचे बंड म्हणाले.