४० उमेदवारी अर्जांची उचल, दोन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:52 PM2018-05-02T23:52:24+5:302018-05-02T23:52:36+5:30
स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आतापर्यंत ४० इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल केली व दोन अर्ज दाखल आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आतापर्यंत ४० इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल केली व दोन अर्ज दाखल आहेत.
प्रवीण पोटे यांनी २७ एप्रिल रोजी भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, तर २ मे रोजी काँग्रेसच्यावतीने महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनिल माधोगडिया यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसद्वारा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण, हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी स्पष्ट होईल. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने या निवडणुकीत इतर कोण इच्छुक नामाकंन दाखल करतात, हेसुद्धा ३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.
अनिल माधोगडिया यांची उमेदवारी दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अनिल माधोगडिया यांनी काँग्रेसच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, काँग्रेस पक्षाने त्यांना अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांच्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. काँग्रेसचा उमेदवार कोण, याबाबत गुरुवारी ३ वाजता चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. माधोगडिया यांचा अर्ज भरताना जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख व आ. वीरेंद्र जगताप, बबलू शेखावत, विलास इंगोले, किशोर बोरकर, वंदना कंगाले, नीलिमा काळे, सुनीता भेले, अभिनंदन पेंढारी, आनंदबाबू भामोरे, राजू भेले, वसंतराव साऊरकर, पुरुषोत्तम बजाज, सुरेश स्वर्गे आदी उपस्थित होते.