इंग्रजीचा धसका; विभागातील चार हजार विद्यार्थ्यांची पेपरला दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:47 PM2023-02-23T17:47:26+5:302023-02-23T17:47:52+5:30
५२३ केंद्रांवर परीक्षेला सुरुवात; ९७.१९ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवार, २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला अमरावती विभागातून तब्बल ३ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. त्यात अमरावती, अकोला, वाशिम,बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेसाठी विभागातील ५२३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी विभागातून १ लाख ४१ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३७ हजार ४१० विद्यार्थ्यांनी पेपर दिला, तर ३ हजार ९६४ विद्यार्थी गैरहजर होते. ४०८ विद्यार्थी ऐनवेळी परीक्षा केंद्राबाहेरील फलकावर आसन क्रमांक शोध विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी. प्रविष्ट झाले होते. पाचही जिल्ह्यांतील ३९६४ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाच्या पेपरकडे पाठ फिरविली होती, तर विभागात ९७.१९ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली आहे.
विभागात पाच कॉपीबहाद्दर
विभागात दोन कॉपीबहाद्दरांना भरारी पथकाने पकडले आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत परीक्षा पार असताना बुलढाणा जिल्ह्यात भरारी पथकाने कारवाई करीत चार, तर यवतमाळ जिल्ह्यात एक़ असे एकूण ५ कॉपी प्रकरणे उजेडात आणली, तर अमरावती, वाशिम, अकोला या जिल्ह्यांत कॉपी प्रकरण निरंक होते.