भूखंड मालकीसाठी ४१ कुटुंबांची परवड

By admin | Published: April 24, 2017 12:48 AM2017-04-24T00:48:53+5:302017-04-24T00:48:53+5:30

भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले ४१ कुटुंब मालकीसाठी शासकीय नियमांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.

41 families to own land | भूखंड मालकीसाठी ४१ कुटुंबांची परवड

भूखंड मालकीसाठी ४१ कुटुंबांची परवड

Next

नझूल विभागाचा कारभार : पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
धामणगाव रेल्वे : भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले ४१ कुटुंब मालकीसाठी शासकीय नियमांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. नझूल विभाग या कुटुंबाच्या आयुष्याशी खेळत आहे़ पालकमंंत्र्यांनी लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी लोकदरबारात या कुटुंबांनी केली़
धामणगाव रेल्वे शहराच्या दक्षिण भागात शीट नं़३० ए प्लाट नं़ ४४ ते ५० व १२९ ते १६२ असा भूखंड यापूर्वी गणेशदास गुलाबचंद फर्मकडे ३० वर्षे भाडे पट्ट्यावर होता़ या फर्मची भाडेपट्टेची मुदत ४० वर्षांपूर्वी संपली. सदर जागेचा ताबा भाडेपट्टेधारकांनी सोडले असल्याचे येथील ४१ कुटुंबांचे म्हणणे आहे़
या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील संबंधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी दररोज कार्यालयाचे दरवाजे झिजवत आहेत. भाडेपट्टा संपल्याने सदर भूखंड नझूल रेकॉर्डवर शासकीय नोंद होणे गरजेचे आहे़ तसेच या भागात रहिवासी असलेल्या कुटुंबीयांना ही जागा हस्तांतरित करणे महत्त्वाचे आहे़ दरआठवड्याला पाटील या जिल्हा प्रशासन व नझूल विभागाकडे आपली कैफियत मांडत आहे.
शुक्रवारी पालकमंत्री प्रवीण पोटे शहरात आले असता अरुण अडसड यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी ज्योती पाटील, वनमाला नंदेश्वर, छाया गजभिये, मंगला हटकर, सुधा भेंडे, अरूणा रंगारी, मीरा खरे, रामरती रील, भुरीयाबाई बमनेले, सूर्यकांता वानखडे, संगीता पाटील, गीता चावरे, शकुंतला पाटील, रीता नंदेश्वर, नेहा रंजुम, शालू नंदेश्वर, मीना पडघान, दर्शना गजभिये आदी उपस्थितत होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 41 families to own land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.