पोटात आग, जमिनीच्या अन् शेतकऱ्याच्याही; चांदूरबाजार वगळता १३ तालुक्यात ४२ टक्के कमी पाऊस
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 5, 2023 04:32 PM2023-09-05T16:32:47+5:302023-09-05T16:33:12+5:30
पाणीटंचाईची शक्यता
अमरावती : साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जमिनीचे पुनर्भरण होऊन भूजलपातळीत वाढ होत असते. यंदा मात्र याचे उलट स्थिती आहे. ८५ टक्के पावसाळा संपला असतांना जिल्ह्यात सरासरीच्या ४२ टक्के पावसाची तूट आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा असून चांदूरबाजार तालुका वगळता अन्य १३ तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता आहे.
गतवर्षी मेळघाट वगळता सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली होती. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण झाल्याने चार वर्षात भूजलस्तरात पहिल्यांदा समाधानकारक वाढ झाली जून महिन्यात जिल्ह्यात पाच वर्षाचे तुलनेत सरासरी ०.६५ मीटर भूजलात वाढ झाली होती. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात भूजलाच्या पातळीत सर्वाधिक ३.१० मीटर वाढ नोंदविण्यात आलेली होती. यंदा मात्र विपरीत स्थिती आहे.