४२ जलप्रकल्प पोहोचले ९,७०० कोटींवर

By admin | Published: May 8, 2016 12:05 AM2016-05-08T00:05:47+5:302016-05-08T00:05:47+5:30

जिल्ह्यात सन २०१६-१७ चे बांधकामातील २ मोठे, मध्यम ८ व ३२ लघु प्रकल्प असे एकूण ४२ जल प्रकल्पांचे काम ९ हजार ६७४ कोटी ७७ लाखांवर पोहोचले आहे.

42 water projects reached 9, 700 crores | ४२ जलप्रकल्प पोहोचले ९,७०० कोटींवर

४२ जलप्रकल्प पोहोचले ९,७०० कोटींवर

Next

५,७६४ कोटींचा खर्च : उर्वरित कामांसाठी ३,९१० कोटींची गरज
गजानन मोहोड  अमरावती
जिल्ह्यात सन २०१६-१७ चे बांधकामातील २ मोठे, मध्यम ८ व ३२ लघु प्रकल्प असे एकूण ४२ जल प्रकल्पांचे काम ९ हजार ६७४ कोटी ७७ लाखांवर पोहोचले आहे. या प्रकल्पांवर मार्च २०१६ अखेर ५ हजार ७६४ कपटे १५ हजारांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पांचे उर्वरित असे ३ हजार ९०९ कोटी ८१ हजारांचे बांधकाम अद्याप शिल्लक आहेत.
सन २०१६ मध्ये ही कामे मार्गी लागावीत यासाठी ६२८ कोटी २१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २ मुख्य प्रकल्पांवर १५० कोटी २१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २ मुख्य प्रकल्पावर १५० कोटी ६५ लाख, ८ मध्यम प्रकल्पांवर २२६ कोटी ४१ लाख व ३२ लघु प्रकल्पांवर २५१ कोटी ७ लाखांची तरतूद जलसंपदा विभागाद्वारा करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ५७४ हेक्टर सिंचन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत.
या सर्व प्रकल्पांच्या उर्वरित कामांच्या नियोजनासाठी २०१७-१८ वर्षात १ हजार ८६६ कोटी ८४ लाख, २०१८-१९ या वर्षाकरिता ११०० कोटी व २०१९-२० या वर्षाकरिता ३०७ कोटी ८१ लाखांचे नियोजन करण्यात आले आहे. उर्ध्व प्रकल्प मंडळांतर्गत यापूर्वी २०११-१२ मध्ये ३४३ कोटींची तरतूद असताना ३२१ कोटी ५१ लाखांचा खर्च झाला आहे. २०१२-१३ मध्ये ३४१ कोटी असताना ३२१ कोटी ५१ लाखांचा खर्च झाला आहे.

लघु प्रकल्पांचीही कामे होणार
अमरावती : २०१२-१३ मध्ये ३४१ कोटी ३० लाखांची मंजुरी असताना २६२ कोटी २४ लाखांचा खर्च झाला आहे. २०१३-१४ वर्षामध्ये ३०१ कोटी ४८ लाखाचा मंजूर तरतूद असताना २५७ कोटीचा खर्च झाला आहे. २०१४-१५ या वर्षात ३३१ कोटी ५५ लाखांची तरतूद असताना २०९ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च झाला आहे.
२०१४-१५ या वर्षात ३३१ कोटी ५५ लाखाची तरतूद असताना २०९ कोटी ५४ लाखांचा खर्च झाला आहे. २०१५-१६ या वर्षात ३७१ कोटींची तरतूद असताना ६०२ कोटी असे एकूण २०११ ते २०१६ या वर्षात १ हजार ६८९ कोटीची तरतूद असताना १ हजार ६५३ कोटीचा खर्च करण्यात आला आहे.
अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत मागील ५ वर्षांत ९६३ कोटी १० लाखांची तरतूद असताना ९२० कोटी ५१ लाखांचा खर्च या जलप्रकल्पांवर झाला आहे.
जिल्ह्यात बांधकामामधील ४२ प्रकल्प आहेत. यापैकी सुधारीत प्रशासकीय मान्यता असलेले २ मोठे, ७ मध्यम व २० लघुप्रकल्प असे एकूण २९ प्रकल्प आहे. २ मध्यम व ९ लघु प्रकल्पांच्या सुप्रमांचे प्रस्ताव एसएलटीएसीला वर्ग आले. क्षेत्रीय स्तरावर १३ प्रकल्प कार्यवाहीत आहे. प्रकल्पांच्या उर्वरित कामसिंाठी ३ हजार २७३ कोटींची गरज आहे. यामध्ये मोठ्या प्रकल्पांना २८८ कोटी, मध्यम प्रकल्पांना ७९ कोटी निधीची गरज आहे. २०१७-१८ करीता १ हजार ८६६ कोटी ८४ लाख, २०१८-१९ करीत ११०० कोटी ४७ लाख व २०१९-२० करीता ३०७ कोटी ८१ लाखांची गरज आहे.

२०१७ ते २०२० दरम्यान पूर्ण होणारे प्रकल्प
जिल्ह्यात २०१७-१८ दरम्यान सपन २६ कोटी, चंद्रभागा ६.७६ कोटी, पाक नदी १४.८, चांदस वाठोडा ४.६४, भगाडी ६.१८, सोनगाव शिवणी ८.५५, वाघाडी बॅरेज १०.८६ व सामदा सौदडी १०.२०, चंद्रभागा बॅरेज २२.५९, करजगाव १७.९३, रायगड ११.५८, बोरनदी ११.३४, टाकळी १५.१३, चांदी नदी ६.२, टिमटाला ५.४५, नागठाणा ३.१७, थिगडी ७.६७, पवनी ०.१४ व आमटाली प्रकल्पासाठी १४.१३ कोटीची तरतूद आहे.
२०१८-१९ मध्ये उर्ध्व वर्धा ३१३.०४ कोटी व मुर्तिजापूर तालुक्यामधील पंढरी ४७.८८ कोटी, गर्गा ३५.०७ कोटी व मुर्तिजापूर तालुक्यामधील घुंगसी बॅरेज ६०.९२, बागलिंगा ६.६५, निम्न साखळी २०.४६, राजूरा १४.९८, निम्न चारगढ १६.०८, पाटीया प्रकल्पासाठी ७.०१ कोटीची तरतूद आहे.
२०१९-२० मध्ये निम्न पेढी ७३२.५६ कोटी, बोर्डी नाला १७६ कोटी व पढी बॅरेज प्रकल्पासाठी १८२ कोटी संभाव्य खर्च लागणार आहे.

Web Title: 42 water projects reached 9, 700 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.