तीन दिवसांतील वादळासह पावसाने ४२० कुटुंबे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:40+5:302021-06-06T04:09:40+5:30
अमरावती : जिल्ह्यात २८ ते १ जून दरम्यान वादळासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात नऊ तालुक्यांतील ५६ गावांमध्ये नुकसान झाल्याचा ...
अमरावती : जिल्ह्यात २८ ते १ जून दरम्यान वादळासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात नऊ तालुक्यांतील ५६ गावांमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये ४०३ घरांची पडझड झाली आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील ४२० कुटुंबे बाधित झाली आहेत. यामध्ये मोर्शी तालुक्यात १०७, अंजनगाव सुर्जी १०५, धारणी ७८, भातकुली तालुक्यात ५६, चांदूर रेल्वे ३१, धामणगाव रेल्वे १८, दर्यापूर १५, तर चिखलदरा तालुक्यात एक कुटुंब बाधित झाले. याशिवाय एक म्हैस, एक बैल व ६० कोंबड्या दगावल्या. वादळासह पावसाने ३३० घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये अंजनगाव सुर्जी ९२, मोर्शी ८४, भातकुली ५६, चांदूर रेल्वे २९, धारणी २७, दर्यापूर १५, धामणगाव रेल्वे १२ व चिखलदरा तालुक्यात ८ घरांचे नुकसान झाले.
बॉक्स
पाच तालुक्यांतील ७३ घरे जमीनदोस्त
वादळासह पावसाने ७३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यामध्ये धारणी तालुक्यात ५१, अंजनगाव सुर्जी १३, धामणगाव रेल्वे ६, चांदूर रेल्वे २ व अमरावती तालुक्यात एक घर जमीनदोस्त झाले. याशिवाय २४ झोपड्या व ६५ गोठ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.