तालुक्यात दोन दिवसांत ४२१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:22+5:302021-05-03T04:08:22+5:30

संजय खासबागे वरूड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता नागरिकांच्या मुळावर उठला आहे. दोन दिवसांच्या कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहिल्यास अमरावती ...

421 corona positive in two days in the taluka | तालुक्यात दोन दिवसांत ४२१ कोरोना पॉझिटिव्ह

तालुक्यात दोन दिवसांत ४२१ कोरोना पॉझिटिव्ह

Next

संजय खासबागे

वरूड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता नागरिकांच्या मुळावर उठला आहे. दोन दिवसांच्या कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहिल्यास अमरावती शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या वाढतीच आहे. त्यातही शनिवार व रविवारची बाधितांची रुग्णसंख्या पाहता वरूडमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात शुक्रवारी २१७, तर शनिवारी २०४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तरी सुद्धा प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांची गर्दी कायमच आहे. तालुक्यातील काही गावे सील करण्यात आली. मात्र, ती नावापुरतीच राहिली आहेत.

३० एप्रिल रोजी तालुक्यात २१७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यात वरूड ६२, जरूड २६, टेंभुरखेड़ा १४, शेंदूरजनाघाट ११, राजुरा बाजार ७, बेनोडा शहीद ७, वाठोडा ७, वंडली ७, बेसखेडा ५, पेठ मांगरुळी ४, सावंगा ४, मांगरुळी ६, लोणी ४, रोशनखेडा ४, पिंपळखुटा ४, अमडापूर ३, इसंब्री ३, सावंगी ३, पुसला ३, कुरळी ३, मोरचूद २, नांदगाव २, उदापूर २, गाडेगाव २, वाईखुर्द २, चिंचरगव्हाण २, मेंढी २, मोर्शी खुर्द १, धनोडी १, खानापूर १, ढगा १, फत्तेपूर १, तिवसाघाट १, सातनूर १, पळसोना १, गोरेगाव १, मालखेड १, इत्तमगाव १, डवरगाव १, चांदस १, बहादा १, सुरळी १, काचुर्णा १ याप्रकारे वरूड शहरासह ४३ गावांतील बाधितांचा समावेश होता.

तर १ मॆ रोजी वरूड ७०, जरूड ८, टेंभुरखेडा १०, शेंदूरजनाघाट १२, बेनोडा (शहीद) १०, पुसला ६, सुरली ५, राजुरा बाजार ३, अमडापूर ५, ढगा ४, मोरचूद ४, वाठोडा ३, लिंगा ३, वंडली २, बेसखेडा १, मांगरुळी ३, सावंगी ८, लोणी ३, शिरपूर २, चिंचरगव्हाण ३, घोराड २, आमनेर १, तिवसाघाट ३, वाईखुर्द १, गाडेगाव १, एकदरा १, कुरळी १, धनोडी १, वाडेगाव १, सातनूर ३, शिंगोरी १, उमरी १, गव्हाणकुंड १, जामगाव खडका १, देउतवाडा ३, पवनी १, करजगाव ३, काचुर्णा १, बेलोरा १, आलोडा २, नागझिरी २, हातुर्णा २, जामगाव २, इसंब्री २, पळसोना १ वरूड शहरासह ४५ गावांमध्ये दुसऱ्या दिवशी २०४ नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

लॉकडाऊनचा बोजवारा

जिल्ह्याच्या तुलनेत २० ते २५ टक्के रुग्ण संख्या एकट्या वरूड तालुक्यात असल्याने तालुका हॉटस्पॉट झाला आहे. अनेकांचे मृत्यू झाल्याने देखील वरूड तालुका हादरला आहे. लॉकडाऊनसह उपाययोजनांचा बोजवारा उडाला आहे. तालुका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन करते तरी काय, हा प्रश्नच आहे. दोन दिवसांच्या कोरोना चाचणी अहवालाने वरूड तालुक्याची झोप उडाली आहे.

Web Title: 421 corona positive in two days in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.