४२१ ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणार महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:58+5:302021-02-07T04:12:58+5:30
अमरावती : एप्रिल २०२० ते २०२५ या कालावधीसाठी नव्याने गठित होणाऱ्या ८४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...
अमरावती : एप्रिल २०२० ते २०२५ या कालावधीसाठी नव्याने गठित होणाऱ्या ८४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक या रचनेनुसार ४२१ सरपंचपदे महिलाकडे जाणार आहेत.
जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायती आहेत. यापैकी एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५५३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आरक्षण साेडतीचा कार्यक्रम २ व ४ फेब्रुवारी रोजी पार पडला. यात ग्रामविकास विभागाच्या ६ व ५ मार्च रोजीच्या अधिसूचनेनुसार एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीतील जिल्हाभरातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनुसार महाराष्ट्र (ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच) निवडणूक १९६४ चे नियम ३ (अ) आणि (ब) तसेच नियम २ ( अ) पोटनियम ४ अन्वये मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांतील पूर्णत: अनुसूचित जमाती क्षेत्रातील ११५ ग्रामपंचायतींपैकी ५८ ठिकाणी महिला सरपंच गावाची धुरा सांभाळणार आहेत. यामध्ये धारणी तालुक्यातील ६२ पैकी ३१ व चिखलदरा ५३ पैकी २७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील दर्यापूर, भातकुली, अंजनगाव सुर्जी, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, चांदूर रेल्वे, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, धामणगाव रेल्वे, तिवसा आणि वरूड या १२ तालुक्यांतील ७२५ ग्रामपंचायतींपैकी ३६३ ग्रामपंचायतीवर महिला सरपंच राहणार आहेत. यामध्ये मेळघाट वगळता अन्य १२ तालुक्यांत अनुसूचित जमातीच्या ७७, अनुसूचित जमाती ३२, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे ९८, सर्वसाधारण १५६ याप्रमाणे आरक्षण सोडतीनुसार महिलांसाठी सरपंचपद राखीव राहणार आहे.
बॉक्स
तालुकानिहाय महिलांसाठी राखीव सरपंचपदे
तालुका एकूण ग्रा.प. अनु.जाती. अनु जमाती नामाप्र सर्वसाधारण
दर्यापूर ७४ १० ०३ १० १५
भातकुली ४८ ०६ ०२ ०७ १०
अंजनगाव ४९ ०६ ०१ ०६ १०
नांदगाव खं ६८ ०७ ०१ ०९ १६
अमरावती ५९ ०८ ०२ ०८ १२
चांदूर रेल्वे ४९ ०४ ०१ ०७ १३
अचलपूर ७२ ०८ ०५ १० १३
चांदूर बाजार ६६ ०७ ०३ ०९ १३
मोर्शी ६७ ०६ ०४ ०९ १५
धामणगाव रे. ६२ ०५ ०२ ०८ १५
तिवसा ४५ ०४ ०१ ०६ १२
वरूड ६६ ०६ ०७ ०९ १२
एकूण ७२५ ७७ ३२ ९८ १५६