४.२४ लाख भरले; चार वर्षानंतरही ‘डिलिव्हरी’ मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:17 AM2021-09-08T04:17:17+5:302021-09-08T04:17:17+5:30

अमरावती : सध्याच्या आधुनिक काळात ऑनलाईन शॉपिंग व ऑर्डरने चांगलेच बाळसे धरले आहे. डिसकाऊन्टच्या ऑफर्सचे आमिष दाखवत ...

4.24 lakhs paid; No delivery after four years! | ४.२४ लाख भरले; चार वर्षानंतरही ‘डिलिव्हरी’ मिळेना !

४.२४ लाख भरले; चार वर्षानंतरही ‘डिलिव्हरी’ मिळेना !

Next

अमरावती : सध्याच्या आधुनिक काळात ऑनलाईन शॉपिंग व ऑर्डरने चांगलेच बाळसे धरले आहे. डिसकाऊन्टच्या ऑफर्सचे आमिष दाखवत नवनवीन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात चांगलेच यश आले आहे. या ऑनलाईन शॉपिंगने कित्येकांना गंडवले देखील आहे. असाच एक प्रकार स्थानिक रॉयली प्लॉटमधील उद्योजकासोबत घडला आहे. ४.२४ लाख रुपये ऑनलाईन भरल्यानंतरही ऑर्डर केलेली उपकरणे मिळाली नाहीत. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला. ६ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघड झाला.

येथील रॉयली प्लॉटस्थित अग्रवाल कॉमप्लेक्समध्ये शंकर शितलदास शेवाणी यांचे प्रतिष्टान आहे. ते वैज्ञानिक तांत्रिक प्रयोगशाळा व अनुसंधान कार्यालयाला लागणारे उपकरण पुरविण्याचा व्यवसाय करतात. सन २०१६ मध्ये एका कृषी विज्ञान केंद्राला उपकरणाची आवश्यकता असल्याने त्यांनी त्याबाबत इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतला. नवी दिल्ली येथील बायमेट इंडिया प्रा. लिचा संचालक विवेककुमार शर्मा हा ती उपकरणे तयार करून देत असल्याची माहिती शेवाणी यांना मिळाली. त्यासाठी त्यांनी विवेककुमार शर्माशी फोनद्वारे संपर्क साधला. त्याने उपकरण देण्यास होकार दिला. त्यासाठी त्याने पैशाची मागणी केली. सबब, शेवाणी यांनी २२ फेब्रुुवारी २०१७ रोजी ३ लाख व ४ मे २०१७ रोजी १ लाख २३ हजार ८१० असे एकूण ४ लाख २३ हजार ८१० रुपये विवेककुमार शर्माच्या बॅंक खात्यात नेफ्टद्वारे जमा केली. ती रक्कम बॅक खात्यात जमा झाल्यानंतरही आरोपीने उपकरणे पाठविली नाही. काही दिवसांपर्यत देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर फोन रिसिव्ह करणेच बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेवानी यांनी तक्रार नोंदविली, शहर कोतवाली पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून ६ सप्टेंबर रोजी विवेककुमार शर्मा व एक महिला (रा. हनुमान मंदिराजवळ, रोहिणी, नवी दिल्ली) या दोघांविरूध्द भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन रेवस्कर हे करीत आहेत.

////////////

कोट

वैज्ञानिक तांत्रिक प्रयोगशाळेला लागणार्या उपकरणांची डिलिव्हरी न देता ४.२४ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. दिल्लीच्या दोघांविरूद्ध गुन्हे नोंदविले.

निलिमा आरज,

ठाणेदार, कोतवाली

Web Title: 4.24 lakhs paid; No delivery after four years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.