जिल्ह्यातील ४.२८ लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:28+5:302021-04-21T04:13:28+5:30

कोरोना संचारबंदीत काळात अंत्योदय, प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना ५ किलो रेशन अमरावती; कोरोनाचा वाढता संसर्ग विस्कळीत झालेले जनजीवन आणि व्यवहार ...

4.28 lakh families in the district will get free foodgrains | जिल्ह्यातील ४.२८ लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

जिल्ह्यातील ४.२८ लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

googlenewsNext

कोरोना संचारबंदीत काळात अंत्योदय, प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना ५ किलो रेशन

अमरावती; कोरोनाचा वाढता संसर्ग विस्कळीत झालेले जनजीवन आणि व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक दुर्बल घटकासमोर रोजी रोटीचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लागू करतानाच दुर्बल घटकांना मदतीचा हात दिल्याने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदयमधील १ लाख २३ हजार ८९१ रेशन कार्डधारक आणि प्राधान्य गटातील ३०४१२० रेशन कार्डधारक अशा ४ लाख २८ हजार कुटुंबांना मोफत धान्य लाभ मिळणार आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहणार असल्याने गरजूंची अडचण होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रथमत दारिद्र्यरेषेखालील सर्व लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यत्या ३० एप्रिलपर्यंत दिवस संचारबंदी असल्याने मिळणारे पाच किलो धान्य लाभार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाला योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिनस्त यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मोफत धान्य वितरणाची कारवाई केली जात आहे.

बॉक्स

लाभार्थ्यांना मिळणार गहू तांदळाचा लाभ

राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखालील व प्राधान्य गटातील लोकांना दिलासा दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अभियानात आता दुर्बल घटकासह प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण निर्णय अजूनही लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळाले होते. आता राज्य शासनाने दिलासा देत निर्बंध लागू योजनाही लागू केल्याने जिल्ह्यातील ४ हजारावर लाख ९७ हजारावर कुटुंबांची सोय झाली आहे.

बॉक्स

गत वर्षाभरापासून कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेकांच्या हाताला काम नाही. यामुळे या घटकांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने दिलेल्या मोफत धान्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

तालुकानिहाय लाभार्थी कुटुंबांची संख्या

अचलपूर -२२३१९

अमरावती-२२२९४

अमरावती शहर -३२०९३

अंजनगाव सुर्जी -२८१००

चांदूर बाजार -२८४१८

चांदूर रेल्वे -१५७६३

चिखलदरा -७६०५४

दर्यापूर-२५३०३

धामणगाव रेल्वे -१९०२९

धारणी -१०८२८७

मोर्शी-३०५०७

नांदगाव खंडेश्वर-१९३३९

भातकुली-१८०१०

तिवसा -१५८१०

वरूड -३५२०२

बॉक्स

जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या

४९७५२८

बॉक्स

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी

कोरोनामुळे अगोदरच हातचे काम गेल्याने चूल पेटवण्याची चिंता असते. मोफत धान्य मिळणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

लाडकुबाई सहारे

लाभार्थी

कोट

कोरोनामुळे शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आमचा रोजगार बंद आहे. परिणामी, मोफत धान्यामुळे आम्हाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

रंगराव मेश्राम

लाभार्थी

कोट

गेल्या वर्षभरापासून अडचणी सुरूच आहेत. त्यात अजूनही काम सुरू नाही. आता पुन्हा लाॅकडाऊन लागल्याने आम्हाला मदत कोण करणार! आताची धान्याची मदत होत असली तरी आर्थिक अडचण सुरू आहे.

सुभद्राबाई मानकर

लाभार्थी.

Web Title: 4.28 lakh families in the district will get free foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.