ग्रामपंचायत निवडणुकीत ४३ उमेदवार अविरोध

By admin | Published: April 13, 2016 12:11 AM2016-04-13T00:11:01+5:302016-04-13T00:11:01+5:30

जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७७ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

43 candidates in the gram panchayat elections are uncontested | ग्रामपंचायत निवडणुकीत ४३ उमेदवार अविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीत ४३ उमेदवार अविरोध

Next

१७ ला मतदान : उमेदवारी अर्जाअभावी ६७ पदे रिक्त
अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७७ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ४३ पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ते अविरोध निवडून आले आहेत. तर उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ६७ सदस्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे ३४ सदस्यपदांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
अमरावती तालुक्यामधील रोहनखेडा येथे ७ सदस्यपदांसाठी निवडणूक होत आहे. तिवसा तालुक्यामधील उंबरखेड येथे २ सदस्य अविरोध निवडून आल्याने ५ पदांसाठी निवडणूक होत आहे. घोटा येथे १ पद अविरोध झाल्याने पाच पदांसाठी निवडणूक होणार आहे. आखतवाड्याचे सहा सदस्य अविरोध निवडून आल्याने एका पदासाठी तर कवाडगव्हाण येथे तीन सदस्य अविरोध निवडून आल्याने चार सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे.
७७ ग्रापंच्या पोटनिवडणुकीमध्ये १०९ सदस्यपदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे ६७ ग्रामपंचायत सदस्यपदे रिक्त राहिली आहेत. ३१ पदांसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ३१ उमेदवार अविरोध निवडून आले आहे.
३३ पदांसाठी होणार निवडणूक
ग्रापं सार्वत्रिक निवडणुकीमध्ये २३ रिक्तपदांसाठी निवडणूक होत आहे. तर पोटनिवडणुकीत माहुली, सावर्डी, काटआमला, वणी, म्हैसपूर, पोरगव्हाण, मनिमपूर, बेनोडा, जळगाव येथील ११ रिक्त सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 43 candidates in the gram panchayat elections are uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.