४३ नमुने निगेटिव्ह; एक पाठविला पुनर्तपासणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:23+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवारी १० व तत्पूर्वी ३४ असे ४४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी तपासणीला पाठविलेल्या अहवालातील नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नमुना तपासणीसाठी तांत्रिक त्रुटीमुळे नाकारला गेला. तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. शनिवारी चार नागरिकांचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परदेशातून परतलेल्या नागरिकांचे शुक्रवारपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले ४३ थ्रोट स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. यादरम्यान अशा १४० जणांपैकी १३५ व्यक्तींशी पथकांचा संपर्क झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवारी १० व तत्पूर्वी ३४ असे ४४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी तपासणीला पाठविलेल्या अहवालातील नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नमुना तपासणीसाठी तांत्रिक त्रुटीमुळे नाकारला गेला. तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. शनिवारी चार नागरिकांचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी, होम क्वारंटाइन आदी उपाययोजना होत आहेत. पथकांकडून प्रवाशांशी संपर्क व पाठपुरावा होत आहे. जिल्ह्यात रेल्वे, एसटी व खासगी बसमधील प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आंतरराज्य सीमेवरही पथके नेमण्यात आली आहेत. आरोग्य विभागाकडून यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात आससोलेशन कक्षही तयार करण्यात आला आहे. वलगाव येथे विलगीकरण क्षेत्रही तयार करण्यात आले असून, सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातही आवश्यकता भासल्यास आयसोलेशन, क्वारंटाइन आदींच्या अनुषंगाने कक्ष सुसज्ज ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भेटीदरम्यान दिले.
आंतरराज्य सीमा भागात वाहनांची तपासणी
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याशी संलग्न आंतरराज्यीय सीमेवर पोलीस व परिवहन विभागामार्फत चेकपोस्ट, तपासणी पथके तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परराज्यांतून येणाºया वाहनांची तपासणी करावी. प्रवासी व चालक यांची सर्वसाधारण तपासणी करावी. ताप, खोकला, सर्दी व इतर लक्षणे आढळल्यास तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले.
शासकीय रुग्णालयांच्या २०० मीटर अंतरात दुकानबंदी
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांच्या २०० मीटर हद्दीतील सर्व पानटपºया, चहा कँटीन, फेरीवाले यांची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यामधून किराणा, दूध, भाजी, औषधविक्री दुकाने वगळली आहेत. उल्लंघन केल्यास भादंविचे कलम १८८ अन्वये कारवाई होणार आहे.