पश्चिम विदर्भात म्युकरमायकोसिसचे ४४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:18+5:302021-05-23T04:12:18+5:30

अमरावती : कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांना पुन्हा ‘म्युकरमायकोसिस’ या पोस्ट कोविड आजाराचा सामना करावा लागत आहे. पश्चिम विदर्भात ...

44 deaths due to myocardial infarction in West Vidarbha | पश्चिम विदर्भात म्युकरमायकोसिसचे ४४ मृत्यू

पश्चिम विदर्भात म्युकरमायकोसिसचे ४४ मृत्यू

Next

अमरावती : कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांना पुन्हा ‘म्युकरमायकोसिस’ या पोस्ट कोविड आजाराचा सामना करावा लागत आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत १८३ रुग्ण या आजाराने बाधित झाले व उपचारादरम्यान ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १८३ रुग्णांपैकी १८१ रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले व उपचारानंतर ९३ रुग्ण बरे झाले. याशिवाय ४४ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

मृतांमध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ रुग्ण आहेत. या आजाराची राज्यातील सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. पाचही जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ४४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. याशिवाय ९३ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

बॉक्स

‘म्युकर मायकोसिस’ची जिल्हानिहाय स्थिती

आरोग्य विभागाच्या अहवालानूसार अमरावती जिल्ह्यात ६६ रुग्णांची नोंद झाली, यामध्ये ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात ६६ रुग्णांची नोंद जाली यात ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ७ रुग्णांची नोंद झाली, यामध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यत ३५ रुग्नांची नोंद झाली व यामध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यात ९ रुग्णांची नोंद झाली व २ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २४.०४ टक्के आहे.

Web Title: 44 deaths due to myocardial infarction in West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.