अकरावीच्या १५,३६० पैकी ४४३२ जागा रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:23 AM2021-02-18T04:23:10+5:302021-02-18T04:23:10+5:30
महापालिकेच्या क्षेत्रात ६१ कनिष्ठ महाविद्यालय असून चार शाखा मिळून या महाविद्यालयात एकूण १५ हजार ३६० जागा ...
महापालिकेच्या क्षेत्रात ६१ कनिष्ठ महाविद्यालय असून चार शाखा मिळून या महाविद्यालयात एकूण १५ हजार ३६० जागा आहेत. यंदा जुलैमध्ये शैक्षणिक सत्र सुरू झाले. कोरोना संक्रमणामुळे सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला सप्टेंबर मध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्याने ब्रेक लागला. परिणामी प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली. दोन महिने बंद राहिलेले प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.१६ फेब्रुवारी ही इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम मुदत होती. या मुदती अखेर ६१ महाविद्यालयातील १५ हजार ३६० जागांपैकी १० हजार९२८ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही अजूनही ४४३२ जागा रिक्त आहेत. यात विज्ञान शाखेतील १००४, वाणिज्य शाखेतील ४९५, कला शाखेतील १०८१ व एमसीव्ही शाखेतील सर्वाधिक १८५२ जागांचा रिक्त जागांचा समावेश आहे.
बॉक्स
प्रवेशाची अंतिम स्थिती
एकूण जागा १५,३६०
एकूण महाविद्यालये ६१
झालेले प्रवेश १०९२८
बॉक्स
शाखा उपलब्ध जागा झालेले प्रवेश
विज्ञान ६५४० ५५३६
वाणिज्य २४२५ १९३०
कला ३३७५ २२९४
एमसीव्हीसी ३०२० ११६८