मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी जाणारी ४५ गुरे पकडली

By admin | Published: November 16, 2016 12:21 AM2016-11-16T00:21:39+5:302016-11-16T00:21:39+5:30

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बहिरम चेक पोस्टवर मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ...

45 cows caught for slaughter in Madhya Pradesh | मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी जाणारी ४५ गुरे पकडली

मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी जाणारी ४५ गुरे पकडली

Next

आरोपी पसार : शिरजगाव पोलिसांची कारवाई
परतवाडा : शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बहिरम चेक पोस्टवर मंगळवारी दुपारी १२.३० वाजता पोलिसांनी एका ट्रक मध्ये कोंबुन जाणारे ४५ गौवंश पकडल्याने मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी गुरांना ट्रकमध्ये नेत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे
मंगळवारी बहिरम येथे मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या आरटीओ चेक पोस्टवर ट्रक क्रमांक एमपी ०७ जी ७२७७ ची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन कप्प्यात गौवंश कोम्बून कत्तलीकरिता नेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने चेक पोस्टवरील अधिकाऱ्यांनी तत्काळ सदर माहिती शिरजगावचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांना दिली. त्यावरून पोलिसांनी तपासणी केली असता गुरांना तडपत्री मध्ये बांधून नेट असल्याचा नवीन प्रकार उघडकीस आला. सपोनी मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्त्वात पोलीस पथकाने ४० ते ४५ बैल कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असलेलो वाहन थांबविल्याने त्यातील पसार आरोपी वर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि, क. ५ (अ), (१), ९ व प्राणी अत्याचार प्रतिबंधक अधि ११ (१), सह कलम ४२९ भादंवी सहकलम ११९ मो. वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. या करवाईत शिपाई सूरज, सुमित, सहापोलीस उपनिरीक्षक कवाडे, शिंदे एपीआई मगर्दे करवाई करण्यात येत आहे. जनावरे ही गोरक्षण संस्था येथे पाठवली. (प्रतिनिधी)

आरोपी पसार
मद्यप्रदेशातून अवैधरीत्या गोवंश कत्तलीसाठी नेहमीच नेल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. बहिरम चेक पोस्टवर झालेल्या या कार्यवाहित आरोपी पसार झाले आहे. शिरजगाव पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Web Title: 45 cows caught for slaughter in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.