४५ दिवसांत शिवभोजन थाळीने भागविली दीड लाखांवर नागरिकांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:09+5:302021-06-06T04:10:09+5:30

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी होत असताना, १५ एप्रिल ते ३१ मे अशा ...

In 45 days, Shivbhojan plate satisfies the hunger of over one and a half lakh citizens | ४५ दिवसांत शिवभोजन थाळीने भागविली दीड लाखांवर नागरिकांची भूक

४५ दिवसांत शिवभोजन थाळीने भागविली दीड लाखांवर नागरिकांची भूक

Next

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी होत असताना, १५ एप्रिल ते ३१ मे अशा जवळपास ४५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील २४ केंद्रांवर १ लाख ६१,६५२ थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातील गोरगरीब, गरजू लाभार्थींच्या पोटाला आधार मिळाला आहे.

जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्या प्रार्श्वभूमीवर रोजंदारीवर जाणाऱ्या गोरगरीब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या. शिवभोजन थाळी ही त्यापैकी एक आहे. याआधी शिवभोजन थाळी ही पाच रुपयांना उपलब्ध होती. निर्बंधाच्या कालावधीत हीच थाळी मोफत आणि पार्सलद्वारे उपलब्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील २४ केंद्रांद्वारे जिल्हाभरातील १ लाख ६१ हजार ६३२ थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मोफत थाळीचे वितरण १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

बॉक्स

असे मिळते जेवण

शिव भोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, शंभर ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅम भात आणि शंभर ग्रॅमचे एक वाटी वरण एवढे भोजन दिले जाते.

बॉक्स

जिल्ह्यात एकूण २४ केंद्रे

सद्यस्थितीत जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १८ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात अमरावती शहरात पाच आणि बडनेरा येथे एक व ग्रामीण भागातील विविध तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे १८ भोजन केंद्रे सुरू आहेत.

Web Title: In 45 days, Shivbhojan plate satisfies the hunger of over one and a half lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.