बेलोरा गोदामातून ४५ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:59 PM2018-11-04T21:59:37+5:302018-11-04T22:00:07+5:30

बेलोरास्थित दोन गोदामावर अन्न व औषधी प्रशासनाने शनिवारी रात्री छापा मारून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले .

45 lakh worth of gutkha seized in the godora godown | बेलोरा गोदामातून ४५ लाखांचा गुटखा जप्त

बेलोरा गोदामातून ४५ लाखांचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देएफडीएची कारवाई : दोन आरोपी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : बेलोरास्थित दोन गोदामावर अन्न व औषधी प्रशासनाने शनिवारी रात्री छापा मारून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले . त्यात गोदाममालक युसून शाह लुतूब शाह (३६,रा.यास्मीननगर) व अकील अहमद अब्दुल रशीद (३४,रा. ईस्माईल चौक, जुनी बस्ती बडनेरा) याचा सहभाग आहे.
एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे व सचीन केदारे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव यांनी पोलीस संरक्षणात आरको गॅरेजमागील दोन गोदामावर धाड टाकली. दोन्ही गोदामात तंबाखूजन्य गुटख्याचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात आढळून आला. एफडीएने युसून शाह याच्या गोदामातून १३ लाख ३० हजारांचा तर अकील अहमद याच्या गोदामातून ३१ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी रात्री १०.३० वाजता सुरुझालेली ही कारवाई रविवारी पहाटेपर्यंत सुरु होती. गुटख्यासह अन्य मुद्देमाल जप्त करून पाच व्हॅनद्वारे एफडीएच्या गोदामापर्यंत नेण्यात आला. या कारवाईसाठी पोलिसांनी सरंक्षण दिले होते. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी उपस्थित होता. या गुटखा तस्करांचे तार कुणाशी जुळले आहे, ही बाब अस्पष्ट असून यात बडे तस्कर असल्याची शक्यता आहे. गुटखा तस्करी होत असल्याच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली.

या तंबाखूजन्य पदार्थाचा माल
जप्त तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सेवन स्टार गोवा,जीवन गुटखा, क्रिस्टल पानमसाला, भाग्य बागबान, सागर टोबॅको, पानपराग, पानमसाल्याचा मुद्देमाल होता.

मध्यप्रदेशातून
गुटख्याची तस्करी !
एफडीएने दोन्ही गोदाम मालकांना ताब्यात घेऊन गुटखाजन्य पदार्थ जप्त केले. त्याच्या चौकशीनंतर हा गुटख्याचा माल मध्यप्रदेशातून आणल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्या दोघांविरुध्द अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीनंतर दोन्ही आरोपींविरुध्द न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहे.

दोन गोदामांवर धाड टाकून ४५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, ते गोदाम मालक असल्याचे सांगत आहे. पुढील चौकशीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.
- राजेश यादव,
अन्न सुरक्षा अधिकारी.

Web Title: 45 lakh worth of gutkha seized in the godora godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.