नऊ वर्षांत ४५ हजार व्यावसायिकांकडे २५४ कोटी थकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:36 IST2024-07-09T15:35:36+5:302024-07-09T15:36:16+5:30
पीएम मुद्रा लोन योजना : व्यवसाय सुरू पण किस्त भरण्यास विलंब

45 thousand businessmen have not paid 254 crore mudra money back yet
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने एखादी योजना आणली की तिचा फायदा घेण्यापेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. शासन आज ना उद्या कर्ज माफ करेल, या उद्देशाने कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेलाही याचा फटका बसला आहे.
या योजनेत जिल्ह्यात शिशू, किशोर व तरुण अशा एकूण ४४,९९१ खातेदारांनी २५४.२५ कोटींचे कर्ज घेतले, उद्योग उभारले. मात्र, वेळेवर किस्त भरणा होत नसल्याचे दिसून येते. ६ एप्रिल २०१५ रोजी या योजनेचा शुभारंभ झाला होता. या योजनेद्वारे सूक्ष्म व लहान व्यवसायांना १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. याला मुद्रा कर्ज म्हणतात. या योजनेसाठी तारण घेतले जात नाही. सर्वांनी व्यवसाय उभारावे व स्वतःची उन्नती साधावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे.
मुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही.
या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे.
मुद्रा योजनेचे कर्ज तीन
शिशू कर्ज: मुद्रा योजनेत छोट्या व्यावसायिकाला मोठे करण्यासाठी ५० हजारांचे कर्ज देण्याची तरतूद आहे. ३२४९२ खातेदारांना नऊ वर्षात ११०.२७ कोटींचे कर्ज दिले आहे.
किशोर कर्ज : व्यवसायाला उभारी देताना ५१ हजार ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज बँकांद्वारा देण्यात येते. जिल्ह्यात या प्रकारात १२०६८ खातेदारांना १०९.८५ कोटींचे कर्ज दिले आहे.
तरुण कर्ज : मुद्रा लोन योजनेत पाच ते १० लाखांपर्यंत कर्ज बँकांद्वारा दिले जाते. ४३१ तरुणांनी ३४.१२ कोटींचे कर्ज बँकांद्वारा घेतले आहे. अनेक जण किस्त वेळेवर भरला जात नाही.
२५४ कोटींचे वाटप
या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे गहाणखत घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ४४९९१ खातेदारांनी आतापर्यंत म्हणजेच नऊ वर्षांत २५४.२५ कोटींचे कर्ज मुद्रा योजनेत घेतले आहे. बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस दिल्यास खातेदारांकडून सहकार्य मिळत नाही.
थकबाकी वाढली, बँकांसमोर आव्हान
प्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यात ४४,९९१ खातेदारांना २५४.२५ कोटींचे कर्ज दिले आहे. मात्र, या खातेदारांकडून कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले जात नाहीत. त्यामुळे हे कर्ज कसे वसूल करावे, हा प्रश्न विविध बँकांसमोर आहे.
काही खातेदारांद्वारा नियमित भरणा
मुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही. या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे.