४५४ जुगारावर धाडी; ५.७१ कोटींचा मुद्देमाल मालखान्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:56+5:302021-09-17T04:17:56+5:30

पान ४ अमरावती: राज्याच्या अन्य आयुक्तालय क्षेत्रात कोरोना काळात गुन्हेगारीचा आलेख उंचावला असताना, अमरावती शहर आयुक्तालयाने तो नियंत्रणात ठेवण्यासाठी ...

454 gambling raids; 5.71 crore worth of goods in the warehouse! | ४५४ जुगारावर धाडी; ५.७१ कोटींचा मुद्देमाल मालखान्यात !

४५४ जुगारावर धाडी; ५.७१ कोटींचा मुद्देमाल मालखान्यात !

Next

पान ४

अमरावती: राज्याच्या अन्य आयुक्तालय क्षेत्रात कोरोना काळात गुन्हेगारीचा आलेख उंचावला असताना, अमरावती शहर आयुक्तालयाने तो नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा लावल्याने तो नियंत्रित ठेवण्यात यश मिळविले आहे. सप्टेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ या ११ महिन्यांच्या काळात तब्बल ४५४ ठिकाणचे जुगार उध्वस्त करण्यात आले. तेथून तब्बल ५ कोटी ७१ लाख ७९ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याआधीच्या एक वर्षात जुगाराच्या केवळ २६४ केसेस होत्या.

पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शहर आयुक्तालयाची धुरा सांभाळताच सर्व ठाणेदार व गुन्हे शाखा प्रमुखांना अवैध धंद्यावर प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार, एमपीडीए, मोक्का सारखे प्रभावी आयुधे वापरण्यात आली. सप्टेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ मध्ये दारूबंदीच्या १२७८ कारवायांमधून १ कोटी ५८ लाख ६३ हजार ३१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ कायद्यासंदर्भातील १४ केसेसमधून १६ लाख ६३ हजार, तर सात केसेसमधून एकूण १६ लाख ८ हजार ५६० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. वाळुच्या ४७ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर १३ गुन्हे दाखल करण्यात आले. १० केसेसमध्ये एकूण ७३ लाख ७० हजारांचा गोवंश व वाहने जप्त करण्यात आली. तर आम्स ॲक्टच्या ९३ व पिटा ॲक्टच्या २ केसेस करण्यात आल्या.

//////////

कारवाईत दुपटीने वाढ

सप्टेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत जुगाराच्या २६४, दारूबंदी ९०३, अंमली पदार्थ १४, जीववस्तु कायदा ४, गुटखा ४, वाळू १४, गोवंश ६, आर्म ॲक्ट ५४ च्या केसेस करण्यात आल्या. त्यात यंदा सरासरी दुपटीची वाढ नोंदविण्यात आली.

Web Title: 454 gambling raids; 5.71 crore worth of goods in the warehouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.