जिल्हा परिषदेत महिनाभरात ४६ कोरोना संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:00+5:302021-03-07T04:13:00+5:30
अमरावती : जिल्हाभरात गत महिनाभरापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. अशातच जिल्हा परिषदेत १ फेब्रुवारी ते १ मार्च या ...
अमरावती : जिल्हाभरात गत महिनाभरापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. अशातच जिल्हा परिषदेत १ फेब्रुवारी ते १ मार्च या महिनाभराच्या कालावधीत विविध विभागांमध्ये ४६ काेरोना संक्रमित आढळून आले आहेत. यापैकी १५ जणांनी कोरोनावर मात केली, तर ३१ जण उपचार घेत आहेत.
जिल्हा परिषद मुख्यालयात १६ विभाग आहेत. यात आतापर्यंत ४६ काेरोना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागात ३, सामान्य प्रशासन विभाग ६, पंचायत विभाग २, महिला व बाल कल्याण विभाग १, वित्त विभाग १, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ५, सिंचन विभाग १, आरोग्य विभाग ७, समाज कल्याण १, कृषी विभाग २, रोजगार हमी योजना विभाग ७, पशुसंवर्धन विभाग ३, तर प्राथमिक शिक्षण विभागात ५ अशा ४६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यापैकी १५ जणांनी कोरोनावर मात केली. यात सामान्य प्रशासन विभागातील २, वित्त विभाग १, सिंचन विभाग १, आरोग्य विभाग ५, कृषी विभाग १, मग्रारोहयो २, तर प्राथमिक शिक्षण विभागातील ३ जणांचा समावेश आहे.
बॉक्स
३१ जण ॲक्टिव्ह
जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत ३१ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. यात डीआरडीएमधील ३, सामान्य प्रशासन विभाग ४, पंचायत विभाग २, महिला व बाल कल्याण २, पाणीपुरवठा विभाग ५, सिंचन विभाग १, आरोेग्य विभाग २, कृषी विभाग १, मग्रारोहयो ५ आणि प्राथमिक शिक्षण विभागातील ३ असे ३१ जण ॲक्टिव्ह आहेत.