येवदा येथे ४६ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:08+5:302021-07-03T04:10:08+5:30
येवदा : लोकमतचे संस्थापक संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २ जुलै या जयंतीदिनी शुक्रवारी ‘लोकमत रक्ताचं ...
येवदा : लोकमतचे संस्थापक संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २ जुलै या जयंतीदिनी शुक्रवारी ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान शिबिराचा आगाज करण्यात आला. त्याअनुषंगाने ‘लोकमत’ व आमदार बळवंत वानखडे मित्र परिवाराच्यावतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी ४६ व्यक्तींनी रक्तदान केले.
दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, माजी सभापती प्रदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य वंदना करूले, राजू पाटील, ठाणेदार अमूल बच्छाव, अभिजित देवके, विनोद पवार, शिवाजी देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पाटील, सागर देशमुख, अनिल वडतकर, वीरेंद्र मोहोड, राजीव देशमुख, सतीश डाहाके, महेश वांदे उपस्थित होते.
याप्रसंगी येवदा ग्रामस्थांच्यावतीने प्रदीप देशमुख, हर्षराज देशमुख, संध्या देशमुख, मुजिम्मील जमादार, विनोद मेश्राम, रत्नाकर करूले, जितेंद्र ढोके, शिवकुमार अग्रवाल, रत्नाकर करुले, नानासाहेब कळमकर, प्रदीप लांडे, के.एल.सावळे, लोकमत अमरावतीचे ललित पुराणिक, वैभव कोकाटे, अनंत बोबडे यांनी आमदार बळवंत वानखडे यांचे अभीष्टचिंतन केले. सूत्रसंचालन व आभार नीळकंठ बोरोळे यांनी मानले.