‘आधार’चा खोडा; ४६ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 08:21 PM2020-02-15T20:21:11+5:302020-02-15T20:21:39+5:30

सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली.

46,000 farmers do not get PM Kisan Samman Yojana's Benefits | ‘आधार’चा खोडा; ४६ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम मिळेना

‘आधार’चा खोडा; ४६ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम मिळेना

Next

अमरावती : ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार २०८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. यापैकी यंदा वर्षात २३ हजार १८७ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांची मदत मिळाली आहे. आतापर्यंत ९५ हजार ४०६ शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केले असले तरी अद्यापही ४६ हजार ३०७ खाते विनाआधार आहेत. या खातेदारांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. 

सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली. त्यानुसार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात २ लाख ८८ हजार ४६८  शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी १ लाख ७८ हजार ३१५ शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला.

त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्याची अट घालण्यात आली. त्यानंतर १,३५,७३९ शेतकºयांच्या बँक खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात आला. ९६,०७४ शेतकऱ्यांना तिसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी खातेदार शेतकºयांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार पी.एम. किसान योजनेचा लाभ मिळालेल्या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २.५ टक्के नावे केंद्र व २.५ टक्के लाभार्थी निवड जिल्हास्तरावर करण्यात आली. त्यानुसार या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आधार कार्ड संलग्न करण्यासाठी गावागावांत शिबिर घेण्यात येत आहेत.

तालुकानिहाय शेतकरी सहभाग
योजनेमध्ये अचलपूर तालुक्यात २३ हजार ४२२ शेतकरी, अमरावती १७ हजार ५५४, अंजनगाव सुर्जी २१ हजार १७१, भातकुली १७ हजार ५०७, चांदूर रेल्वे १५ हजार ०७१,  चांदूर बाजार २५ हजार ५२५, चिखलदरा १२ हजार ५९५, दर्यापूर २३ हजार ६३८, धामणगाव रेल्वे २० हजार ८८३, धारणी १७ हजार ८१९, मोर्शी २४ हजार ७२५, नांदगाव खंडेश्वर २४ हजार ६६९, तिवसा १८ हजार ६३, तर वरूड तालुक्यात २५ हजार ८८१ शेतकºयांनी सहभाग नोंदविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
 
 योजनेची जिल्हा स्थिती
* अपलोड डेटा - २,८८,४६८
* पहिला हप्ता - १,७८,३१५
* दुसरा हप्ता - १,३५,७३९
* तिसरा हप्ता - ९६,३७४
* यंदा पहिला हप्ता- २३,१८७
* आधार बाकी - ९५,४०६
* आधार दुरुस्ती -४६३०७

Web Title: 46,000 farmers do not get PM Kisan Samman Yojana's Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.