पाच दिवसांनी लसीचे ४६,६०० डोस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:41+5:302021-07-03T04:09:41+5:30

अमरावती : कोविशिल्डचा स्टॉक पाच दिवसांपासून उपलब्ध नसल्यामुळे ७० वर केंद्रे बंद होती. गुरुवारी कोविशिल्डचे ३३,१०० व कोव्हॅक्सिनचे १३,५०० ...

46,600 doses of vaccine available after five days | पाच दिवसांनी लसीचे ४६,६०० डोस उपलब्ध

पाच दिवसांनी लसीचे ४६,६०० डोस उपलब्ध

Next

अमरावती : कोविशिल्डचा स्टॉक पाच दिवसांपासून उपलब्ध नसल्यामुळे ७० वर केंद्रे बंद होती. गुरुवारी कोविशिल्डचे ३३,१०० व कोव्हॅक्सिनचे १३,५०० डोस उपलब्ध झाल्याने शुक्रवारपासून नागरिकांचे लसीकरण नियमित होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्ह्यात कोविशिल्डचा स्टॉक संपल्याने उपलब्ध कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू होते. शक्रवारी सायंकाळपर्यंत ४६,६०० डोस उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ६,१७,०४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये ४,८४,२०१ नागरिकांनी पहिला डोस व १,५२,८४४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४,७३,२३० कोविशिल्ड व १,३७,२१० कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ३५,२५९, फ्रंट लाईन वर्कर ५५,८८१, १८ ते ४४ वयोगटांत ६७,४१९ ४५ ते ५९ वयोगटात २,१७,८७७ व ६० वर्षांवरील २,४०,८०९ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

Web Title: 46,600 doses of vaccine available after five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.