४७ कुटुंबांना सानुग्रह मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:39 PM2019-06-24T22:39:17+5:302019-06-24T22:40:05+5:30
शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
या ठिकाणी रविवारी महापौर संजय नरवणे तसेच आमदार रवि राणा यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार काकडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले होते. यानंतर झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन महापालिकेचे अभियंता करणार आहेत. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी येथील नागरिकांना इतरही मदत कशी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, असे सुचित केले आहे. यावेळी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, माजी महापौर मिलिंद चिमोटे, शिक्षण समिती सभापती गोपाल धर्माळे, नगरसेवक विजय वानखडे, राजेश साहू, तहसीलदार संतोश काकडे, मंडळ अधिकारी संजय ढोक, पटवारी अजय पाटेकर, तलाठी चपटे, तलाठी बाहेकर, तलाठी चव्हाण, तलाठी धर्माळे, डॉ. मतीन अहमद, डॉ. नावेद पटेल, अखिल बाबू, जावेद इरशादी, हुसेन खॉ, डॉ. आबीद हुसेन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सानुग्रह मदतीचा धनादेश अकिलखान मिय्याखान, शेख जफर शेख गफुर, शेख अमीर शेख नबी, सै. तनविर सै.अहमद, अ. जहीर अ. शहीद, अफरोज शेख बब्बू, शेख मुदलाक शेख नसीर, अब्दुल नासीर अब्दुल शब्बीर, जाकीराबी मो. हनिफ, कय्युमशाह अय्युबशाह, शेख आरीफ शेख रहीम, रहेमानशाह अय्युबशाह, सैय्यद रशिद सै. अब्दुल्ला, अन्सारशाह ईरशादशाह, निजामशाह चांदशाह, तसलिमशाह चांदशाह, हफिजखान सुभानखान, साबीरशाह रज्जाकशाह, अब्दुल रशिद मो. याकुब, मोहम्मद अगफाक मो. इशाद, अब्दुल राजीक अ. रशीद, अ. रिहान अब्दुल राजीक, सैय्यद आजम सैय्यद, मोहम्मद सादीक शेख करीम, वसिमशाह कैय्युमशाह, अब्दुल जावेद रशिद, कय्युशा, सैय्यद सलीम सै.भीयु, शेख ईरफान शेख कदिर, शहानाबेगम मारिफ खान, अतिफ खान, अ. रहीक, नाजीमशाह, शमशाद परविन, फराजानकी हुसेन, मोहम्मद अली, आर्बीद खान मिय्याखान, अब्दुल नासीर अब्दुल नासीर, साहेबखाँ, शेख अब्दुल शेख गफ्फार, मुस्साल कुरेशी शेख करीम, राजुभाई, रिजवाना परवीन अली यांना यावेळी देण्यात आला.