८७ सदस्यीय सभागृहात ४७ महिला नगरसेविका

By admin | Published: February 26, 2017 12:08 AM2017-02-26T00:08:42+5:302017-02-26T00:08:42+5:30

अमरावती महापालिकेमध्ये यंदाही महिला नगरसेवकांचा वरचष्मा राहणार आहे.

47 women councilors in 87-member hall | ८७ सदस्यीय सभागृहात ४७ महिला नगरसेविका

८७ सदस्यीय सभागृहात ४७ महिला नगरसेविका

Next

विलास इंगोलेंची डबल हॅट्ट्रिक : भाजपने दिले ३१ नवे चेहरे
अमरावती : अमरावती महापालिकेमध्ये यंदाही महिला नगरसेवकांचा वरचष्मा राहणार आहे. गुरूवारी लागलेल्या निकालात एकूण ८७ नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी ४७ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. यात भाजपच्या सर्वाधिक महिला नगरसेविकांचा समावेश आहे. तर १२ नगरसेविका दुसऱ्यांदा किंवा पाच वर्षाच्या कालावधीनंतर महापालिका सभागृहात पोहोचल्या आहेत.
माजी महापौर विलास इंगोले यांनी तब्बल सहाव्यांदा महापालिका निवडणुकीत मिळविलेला विजय या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्ये ठरले आहे. १९९२ ला महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. १९९२-९७, १९९७-२००२, २००२-२००७, २००७-२०१२ आणि २०१२-१७ या २५ वर्षांच्या कालावधीत इंगोले यांनी सभागृहात वेगवेगळ्या भूमिका वठविल्या. ते महापौर आणि स्थायी समिती सभापतीही होते. त्यापाठोपाठ रिपाइंचे प्रकाश बन्सोड पाचव्यांदा सभागृहात पोहोचले. चेतन पवार, दिनेश बूब आदींनी विजयाची हॅट्रीक साधली. बबलू शेखावत, प्रशांत वानखडे चौथ्यांदा विजयी होवून महापालिकेत परतले.
राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मात्र आरक्षणाचा आकडा ओलांडून अधिक महिला नगरसेविकांनी सभागृहात पाऊल ठेवले. आता सभागृहात ४७ महिला तर ४० पुरूष नगरसेवक आहेत. भाजपच्या तिकिटावर २७, काँग्रेसच्या ८, शिवसेनेच्या तिकीटावर २, बसपाच्या तिकिटावर १, युवा स्वाभिमानवर २ तर ५ महिला नगरसेविका एमआयएमच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. आजपर्यंत कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिलांच्या हाती अमरावतीकरांनी विकासाची दोरी दिली असून त्या विश्वासाला कशा पात्र ठरतात, हे नजिकच्या काळात स्पष्ट होईल. रिना नंदा या माजी महापौरांचा पराभव झाला तर आणखी एक माजी महापौर वंदना कंगाले मात्र पॅनेलसोबत विजयी झाल्या. (प्रतिनिधी)

महापालिकेतील महिला शक्ती
सुचिता बिरे (भाजप), वंदना मडघे (भाजप), सुरेखा लुंगारे (भाजप), प्रमिला जाधव (भाजप), मंजुश्री महल्ले (काँग्रेस), साहेबबी कय्युम शाह (एमआयएम), सैय्यद नजमुन्निसा (एमआयएम), नीता राऊत (भाजप), माधुरी ठाकरे (भाजप), सोनाली करेसिया (भाजप), सोनाली नाईक (भाजप), रिता पडोळे (भाजप), शोभा शिंदे (काँग्रेस), अस्मा खान (काँग्रेस), पंचफुला चव्हाण (भाजप), माला देवकर (भाजप), जयश्री कुऱ्हेकर (शिवसेना), सुगराबी रायलीवाले (बसपा), जयश्री डहाके (भाजप), लविना हर्षे (भाजप), स्वाती कुळकर्णी (भाजप), संगीता बुरंगे (भाजप), हफीजाबी नुर (काँग्रेस), मो. नसीम बानो (एमआयएम), रजिया खातून (एमआयएम), इंदू सावरकर (भाजप), अनिता राज (भाजप), पद्मजा कौंडण्य (भाजप), रेखा भुतडा (भाजप), सुमती ढोके (युवा स्वाभिमान), गंगा अनभोरे (भाजप), रुबिना तबस्सुम (एमआयएम), अर्चना धामणे (शिवसेना), इशरतबानो (बसपा), स्वाती जावरे (भाजप)

सभागृहात पुन्हा पोहोचलेल्या नगरसेविका
निलिमा काळे (काँग्रेस), कुसूम साहू (भाजप), वंदना कंगाले (काँग्रेस), सपना ठाकूर (युवा स्वाभिमान), संध्या टिकले (भाजप), राधा कुरिल (भाजप), नूतन भुजाडे (भाजप), सुनिता भेले (काँग्रेस), हफिजाबी युसुफ (काँग्रेस), सुनंदा खरड (भाजप), मंजुषा जाधव (सेना), वंदना हरणे (भाजप).

हे विद्यमान जिंकले
बाळू भुयार, निलिमा काळे, धिरज हिवसे, कुसूम साहू, दिनेश बूब, वंदना कंगाले, बबलू शेखावत, सपना ठाकूर, अजय गोंडाणे, चेतन पवार, नूतन भुजाडे, प्रदीप हिवसे, विलास इंगोले, सुनिता भेले, हफिजाबी युसुफ, शेख जफर, प्रशांत वानखडे, मंजुषा जाधव, तुषार भारतीय, वंदना हरणे, सुनील काळे, राजेंद्र तायडे, प्रकाश बन्सोड.


तीन स्टँडिंग चेअरमन हरले
अविनाश मार्डीकर यांच्यासह सुगनचंद गुप्ता आणि मिलिंद बांबल हे माजी स्थायी समिती सभापती २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक हरले. त्याचवेळी माजी स्थायी समिती सभापती विलास इंगोले सहाव्यांदा विजयी होवून सभागृहात पोहोचले.

Web Title: 47 women councilors in 87-member hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.