४,७३२ लाभार्थींच्या डीपीआर, ५६ कोटी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 09:59 PM2019-01-15T21:59:37+5:302019-01-15T22:00:56+5:30

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ४७३२ लाभार्थींच्या डीपीआरला केंद्र शासनाच्या समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये मंजूर प्रस्तावाच्या ४० टक्के हिश्श्यापोटी ५५.८६ कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या घटकात लाभार्र्थींंचे उत्पन्न तीन लाखांचे असणे बंधनकारक आहे. यामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राचे घरकुल बांधकाम लाभार्र्थींना करावयाचे आहे. प्रगतीनुसार अडीच लाखांचे अनुदान महापालिका वितरित करणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले.

4,732 DPRs of beneficiaries, 56 crore available | ४,७३२ लाभार्थींच्या डीपीआर, ५६ कोटी उपलब्ध

४,७३२ लाभार्थींच्या डीपीआर, ५६ कोटी उपलब्ध

Next
ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या समितीची मान्यता : पीएमएवाय अंतर्गत ६३ हजार ७३२ आॅनलाईन अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ४७३२ लाभार्थींच्या डीपीआरला केंद्र शासनाच्या समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये मंजूर प्रस्तावाच्या ४० टक्के हिश्श्यापोटी ५५.८६ कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या घटकात लाभार्र्थींंचे उत्पन्न तीन लाखांचे असणे बंधनकारक आहे. यामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राचे घरकुल बांधकाम लाभार्र्थींना करावयाचे आहे. प्रगतीनुसार अडीच लाखांचे अनुदान महापालिका वितरित करणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले.
सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत चार घटकांमध्ये महापालिका क्षेत्रात सन २०२१-२२ पर्यंत २४ हजार ८१० घरकुल बांधण्यात येणार आहेत. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६३ हजार ७३२ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केलेत. या योजनेत सद्यस्थितीत १२० घरकुल पूर्ण होऊन नागरिक राहायला गेले असून, आतापर्यंत आठ लाख ४५ हजारांच्या निधीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिली. ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. राज्यात गृहनिर्माण विभागांतर्गत शहरी भागाकरिता महापालिकाद्वारे याची अंंमलबजावणी करण्यात येत आहे. अमरावती शहरासाठी सन २०२१-२२ या कालावधीपर्यंत शासनाने २४ हजार ८१० ही लाभार्थीसंख्या निश्चित केलेली आहे. यामध्ये सन १७-१८ मध्ये २४८१ लाभार्थी, सन २०१८-१९ मध्ये ४९६२, सन २०१९-२० करिता ४९६३, सन २०२०-२१ करिता ४९६२ व सन २०२१-२२ करिता ७४४३ असे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात आलेले आहे.
घटक क्रमांक १ करिता महापालिका हद्दीत घोषित झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप होण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यासाठी महापालिकेद्वारा जिल्हा प्रशासनास पत्र देण्यात आलेले आहे. घटक क्रमांक २ साठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाचे माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेला ४६०९ अर्ज प्राप्त झाले. ही यादी अग्रणी बँकेला देण्यात आली. त्यानुसार बँकेने २१३ लाभार्थ्यांना गृहकर्ज देण्यात आल्याची माहिती या विभागाचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी दिली.
नऊ लाखांची राहणार सदनिका
महापालिकेच्या हद्दीत मौजा बडनेरा, बेनोडा, निंबोरा, नवसारी, तारखेड, म्हसला, रहाटगाव येथील भूखंडाची निवड करण्यात आलेली आहे. सदनिकेची किंमत नऊ लाख राहणार आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा सहा लाख रुपयांचा असल्याने तो प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील बँकांशी समन्वय साधण्यात येऊन लाभार्थींना गृहकर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया आटोपल्याने विकसक मेसर्स गॅणन डंर्कले यांना १२ डिसेंबरला कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. या अंतर्गत ८६० घरकुल २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात येत असल्याचे उपअभियंता चौधरी यांनी सांगितले.
अशी आहे योजनेची सद्यस्थिती
घरकुलाचे बांधकामासाठी सद्यस्थितीत १९४६ नकाशे मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी ९१३ नकाशांना मंजुरात देण्यात आली, तर या सर्व लाभार्र्थींंना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. या घरकुलांचे जोथ्यापर्यंत बांधकाम झाल्याने ४८९ लाभार्थींकरिता प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. अनुदानाचा दुसरा टप्पा प्रत्येकी एक लाख रूपये हा ३२४ लाभार्थींना देण्यात आला आहे. अनुदानाचा तिसरा टप्पा प्रत्येकी ५० हजार रुपये हे ६३ लाभार्थींना देण्यात आलेले आहे. आतापर्यंत १२० घरकुल पूर्ण झाले असून, लाभार्थी राहावयास गेलेले आहे.

Web Title: 4,732 DPRs of beneficiaries, 56 crore available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.