स्व: जिल्ह्यातील एन्ट्रीसाठी ४८ शिक्षक वेटिंगवरच; १२२ पैकी ७४ शिक्षकांना गैरआदिवासी शाळेत पदस्थापना
By जितेंद्र दखने | Published: October 4, 2022 06:44 PM2022-10-04T18:44:10+5:302022-10-04T18:44:33+5:30
गत दोन वर्ष कोरोनामुळे जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसह जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया रखडली होती.
अमरावती : गत दोन वर्ष कोरोनामुळे जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसह जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया रखडली होती. मात्र आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यातून ४० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार प्रशासनामार्फत या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र बाहेरील जिल्ह्यातून अमरावती जिल्हा परिषदेत येणाऱ्या १२२ पैकी ७४ शिक्षकांचा अपवाद सोडला तर अजूनही उर्वरित ४८ शिक्षक हजर होण्याच्या वेटिंगवरच आहेत. ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीची प्रक्रिया राबविली. पहिल्या टप्प्यात आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या केल्या. आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या केल्या ४० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने १६ जिल्ह्यात गेले तर बाहेरील जिल्ह्यातून ७४ शिक्षक अमरावती दाखल झाले. यामध्ये विविध जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. अद्यापही १२२ पैकी ७४ शिक्षकांचा अपवाद सोडला तर अन्य शिक्षक अजूनही जिल्ह्यात एन्ट्री साठी वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता हे शिक्षक येणार की त्यांना काही दिवस पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार हे पाहण्याजोगे असेल.
जिल्हा अंतर्गत बदल्या होणार?
जिल्हा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही प्राथमिक शिक्षण विभाग सुरू असून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यांतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्ह्यांतर्गत बदलीबाबतची कारवाई सुरू करण्यात यावी. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सेवानिवृत्त, निधन किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेली पदे त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा पद्धतीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजन नंतर उर्वरित रिक्त पदे, संभाव्य रिक्त पदे याबाबतचा तपशील ऑनलाइन बदली प्रणालीवर अद्यावत कराव्यात अशा सूचना शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.
या जिल्ह्यातील शिक्षक येणार
अमरावती जिल्हा परिषदेत यवतमाळ, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग , चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, ठाणे आदी जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने १२२ पैकी उर्वरित ४८ शिक्षक येणार आहे. अद्याप या शिक्षकांना तेथील जिल्हा परिषद कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे हे शिक्षक स्व: जिल्ह्यात येण्यासाठी वेटिंगवरच आहेत.