शेतकरी अपघात योजनेचे ४९ प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:15+5:302021-03-07T04:13:15+5:30
अमरावती : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सन २०१७-१८ पासून आतापर्यंत ३३० प्रस्ताव विमा कंपनीला सादर केले ...
अमरावती : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सन २०१७-१८ पासून आतापर्यंत ३३० प्रस्ताव विमा कंपनीला सादर केले होते. यापैकी फक्त १६१ प्रस्ताव कंपनीद्वारा मान्य करण्यात आले, तर १६१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले. कंपनीद्वारा ४९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेले आहे. याशिवाय त्रुटीच्या पूर्ततेसाठी ७५ प्रस्ताव कृषी विभागाला परत पाठविल्याची माहिती आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास दोन लाखांपर्यंतचा विमा सदर शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबीयास मिळतो. विमा कंपनीद्वारा शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी काढून भरपाई देताना टाळाटाळ करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये ८३ पैकी ६६ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये ८९ प्रस्ताव विमा कंपनीला पाठविण्यात आले. यापैकी ५४ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आलेले आहेत. सन २०१९-२० मध्ये १५८ प्रस्ताव कृषी कंपनीद्वारा विमा कंपनीला पाठविण्यात आल्यानंतर यापैकी फक्त ४१ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
अशी मिळते शेतकऱ्यांना मदत
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख, अपघातात दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातात एक डोळा व दोन अवयन निकामी झाल्यास दोन लाख, अपघातात एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास विमा कंपनीद्वारा एक लाखापर्यंत मदत देण्यात येते.
बॉक्स
या कारणांसाठी शेतकऱ्यांना मदत
* वीज पडून मृत्यू , पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, याशिवाय वाहन अपघात
* लाभार्थी हा १० ते ७५ वयोगटातील विमा पॉलिसी लागू झालेला खातेदार असावा किंवा याच वयोगटातील कुटुंबातील एक सदस्य
* सात-बारा, मृत्यू दाखला, एफआयआर, अपघाताची प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा व वयाचा दाखला
बॉक्स
सर्पदंश, पाण्यात बुडल्याची अधिक प्रकरणे
या योजनेंतर्गत सर्पदंश व पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची सवार्धिक प्रकरणे दाखल झालेली आहेत. याशिवाय वीज पडून मृत्यू व अपघातामुळे मृत्यूची प्रकरणेदेखील दाखल आहेत. कंपनीद्वारा प्रकरणे मंजूर करण्यास बराच कालावधी लागत असल्याची बहुतांश शेतकऱ्यांची तक्रार आहे.
कोट
जिल्ह्यात तीन वर्षांत ३३० प्रकरणे विमा कंपनीला सादर केली. यामध्ये १६१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. ४९ नामंजूर व ७५ प्रकरणे त्रुटीच्या पूर्ततेत आहे. प्रलंबित व त्रुटीच्या प्रकरणासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अनिल खर्चान,
उपसंचालक, कृषी विभाग
बॉक्स
शेतकरी अपघात योजनेची जिल्हास्थिती
वर्ष प्राप्त प्रस्ताव मंजूर नामंजूर्
२०१७-१८ ८३ ६६ ११
२०१८-१९ ८९ ५४ १९
२०१९-२० १५८ ४१ १९