अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:32 PM2023-01-30T23:32:47+5:302023-01-30T23:35:16+5:30

दुपारी १२ पर्यंत ३२,८७२ मतदारांनी हक्क बजावला. ही १५.९४ टक्केवारी होती. दुपारी २ पर्यंत ६२,६६९ मतदान झाले. ही ३०.४० टक्केवारी होती.

49.67 percent voter turnout in Amravati graduate elections | अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान

अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान

googlenewsNext

अमरावती : पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी ४९.६७ टक्के मतदान झाले. यापूर्वी २०१७ मध्ये ६३.५२ टक्के मतदान झाले होते. यावेळी निवडणुकीसाठी एकूण २,०६,१७२ मतदारसंख्या होती. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. १० वाजेपर्यंत ११,३२५ मतदान झाले. ही ५.४९ टक्केवारी होती. 

दुपारी १२ पर्यंत ३२,८७२ मतदारांनी हक्क बजावला. ही १५.९४ टक्केवारी होती. दुपारी २ पर्यंत ६२,६६९ मतदान झाले. ही ३०.४० टक्केवारी होती. शेवटच्या टप्प्यात ४ वाजेपर्यंत ७२,९४३ पुरुष व २९,४५९ स्त्री असे एकूण १,०२,४०३ मतदान झाले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४३.३७ टक्के, अकोला ४६.९१, बुलडाणा ५३.०४, वाशिन ५४.८० तर यवतमाळ जिल्ह्यात ५८.८७ टक्के मतदान झाले आहे. येथील नेमाणी गोडावूनमध्ये २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
 

Web Title: 49.67 percent voter turnout in Amravati graduate elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.