१२ तालुक्यांत सायंकाळी ५ ची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:19 AM2021-02-23T04:19:09+5:302021-02-23T04:19:09+5:30

अमरावती : लॉकडाऊन घोषित करण्यात आलेल्या अमरावती महापालिका, अचलपूर नगर परिषद क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर १२ तालुक्यांमध्ये दुकानांना ...

5 pm limit in 12 talukas | १२ तालुक्यांत सायंकाळी ५ ची मर्यादा

१२ तालुक्यांत सायंकाळी ५ ची मर्यादा

googlenewsNext

अमरावती : लॉकडाऊन घोषित करण्यात आलेल्या अमरावती महापालिका, अचलपूर नगर परिषद क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर १२ तालुक्यांमध्ये दुकानांना ५ वाजता कुलूप लागतील. हा निर्बंध १ मार्चपर्यंत कायम राहील.

विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या. त्यानुसार, सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापना ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवासी, तीनचाकीमध्ये चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवाशांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीसाठी परवानगी राहील. सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात सुरू राहील. भाजी मंडई सकाळी ३ ते ६ या कालावधीत सुरू राहील.

सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील. आठवडाअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदीच्या वेळी ती बंद राहतील. तथापि, दूधविक्री दुकाने ही संपूर्ण सात दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेेळेत सुरू राहतील. सद्यस्थितीमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती, ती रद्द करून सदरचे निर्बंध १ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत घालण्यात येत आहेत, असे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका०यांना एका पत्राद्वारे स्पष्ट केले.

Web Title: 5 pm limit in 12 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.