इर्विन रुग्णालयातील टँकमध्ये ५ टन ऑक्सिजन लिक्विड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:15+5:302021-04-25T04:12:15+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या रुग्णांसह कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. तेथील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू असताना मध्यंतरी लिक्विड ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या रुग्णांसह कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. तेथील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू असताना मध्यंतरी लिक्विड संपल्याने जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ऑक्सिजन तुटवड्याचे वृत्त प्रकाशित होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याने भीती निर्माण झाली होती. त्याची तातडीने व्यवस्था होण्याच्या उद्देशाने लोकमतने वृत्त प्रकाशित केले आणि दुसऱ्याच दिवशी ४ टन लिक्विडचा भरणा तेथील टँकमध्ये करण्यात आला. ते केवळ सहा दिवस चालले. त्यानंतर गुरुवारी टँक रिकामे झाले होते. याची माहिती संबंधित एजन्सीला तातडीने देण्यात आल्याने शनिवारी दुपारी १२ वाजता १२ टन ऑक्सिजन क्लिक्विडने भरलेला टँकर दाखल झाला नि ५ टन लिक्विड येथील टँकमध्ये भरण्यात आले. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया येत आहेत.