अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात ५० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:56 PM2018-01-24T13:56:25+5:302018-01-24T13:58:05+5:30

दर्यापूर तालुका मुख्यालयाच्या नजीक बाभळी टी पॉईंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून तब्बल ५० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला.

50 lakhs of ghatka seized in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात ५० लाखांचा गुटखा जप्त

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात ५० लाखांचा गुटखा जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांची नाकेबंदी करून कारवाईट्रक भरून गुटखा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापूर तालुका मुख्यालयाच्या नजीक बाभळी टी पॉईंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून तब्बल ५० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. हा गुटखा राज्यात विविध ठिकाणी अवैधरीत्या विक्रसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दर्यापूर पोलिसांना गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी तत्क्षण कारवाई करीत दर्यापूर-अंजनगाव मार्गावर नाकेबंदी करून तपासणीला प्रारंभ केला. दरम्यान गुडस गॅरेजचा ट्रक क्र मांक एचआर ३८ एस १२३६ हा बहिरममार्गे अकोला येथे जात होता. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गुटख्याची पोती आढळून आले. हा ट्रक दिल्लीहून आल्याची माहिती मिळाली आहे. या गुटख्याची बाजारात ५० लाखांहून अधिक किंमत असल्याची माहिती आहे. ट्रक जप्त करून दर्यापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ट्रकमालक व माल कुणाचा याची माहिती पोलीस घेत आहे. ही कारवाई ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली शरद सारसे, उपपोलिस निरीक्षक रितेश राउत, बजरंग इंगळे, नीलेश गावंड यांनी कार्यवाही केली.

Web Title: 50 lakhs of ghatka seized in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा