५,०४३ महिला पंतप्रधान अनुदान योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:14+5:302020-12-29T04:12:14+5:30

आरोग्य विभाग : ५१,०६९ महिलांची नोंदणी अमरावती : पंतप्रधान मातृत्व वंदन योजना ही केंद्र शासन पुरस्कृत आहे. ही ...

5,043 women deprived of PM grant scheme | ५,०४३ महिला पंतप्रधान अनुदान योजनेपासून वंचित

५,०४३ महिला पंतप्रधान अनुदान योजनेपासून वंचित

Next

आरोग्य विभाग : ५१,०६९ महिलांची नोंदणी

अमरावती : पंतप्रधान मातृत्व वंदन योजना ही केंद्र शासन पुरस्कृत आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ पासून अंमलात आली आहे. या योजनेत जिल्ह्यात ५६ हजार ११२ एवढे उद्दिष्टांपैकी ५१,०६९ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यात महापालिका क्षेत्रात १३०३७ उदिष्ट होते. त्यापैकी ११,५९८ व ग्रामीण तसेच नागरी क्षेत्रासाठी ४३०५७ उद्दिष्ट होते. त्यापैकी ३९,४७१ लाभार्थ्यांना लाभ मिळाला. यातील शहरी व ग्रामीण भाग मिळून अद्याप ५ हजार ४३ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व लाभार्थ्यांना आतापर्यंत २१ कोटी ४७ लाख ९ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा, यासाठी शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांची नावे शासनाने अधिसूचित केले आहे. संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे. (प्राथमिक आरोग्य केंद्र) सदर महिला व त्याच्या पतीचे आधार क्रमांक असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक आणि आधारसंलग्न बँक अथवा पोस्ट खाते तसेच लेखी सहमती पत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतरच योजनेचा लाभ लाभार्थीना लाभ दिला जातो.

बॉक्स

अशी मिळते मदत

प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेतील लाभार्थींना ५ हजार रुपयांचे तीन टप्प्यांत अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीव्दारे अनुदान जमा केले जाते. यात पहिला टप्पा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपयांचा हप्ता, दुसरा टप्पा किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये आणि तिसरा टप्पा प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस बी वा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर २ हजार रुपये अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केला जातो.

बाॅक्स

तालुकानिहाय लाभार्थी संख्या व नोंदणी

तालुका उद्दिष्ट लाभार्थी संख्या

अमरावती २७३७ २४९२

अचलपूर ५४२५ ६१०१

अंजनगाव ३०५४ ३१५६

दर्यापूर ३३४३ २५७५

चांदूर रेल्वे १८३९ १३८३

भातकुली २१०८ १९६२

चांदूर बाजार ३६३३ ३८५८

नांदगाव २४१९ १८४०

धामणगाव २४८५ २४७९

वरूड ४२६० ३६७६

माेर्शी ३४६२ ३२४८

तिवसा १९८६ १९६९

धारणी ३८५६ ३०४८

चिखलदरा २४६८ १९७६

मनपा १३०३७ ११५९८

एकूण ५६११२ ५१०६९

कोट

पंधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी शासनाकडून पाच हजारांचे अनुदान दिले जाते. आतापर्यंत जिल्हाभरात ५१०६९ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. या लाभार्थ्यांना २१ कोटी ४७ लाख ९ हजारांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: 5,043 women deprived of PM grant scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.