बुबूळ प्रत्यारोपणातून ५२ जणांना मिळाली दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2016 12:27 AM2016-06-09T00:27:37+5:302016-06-09T00:27:37+5:30
दृष्टीहिना्च्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागाने नेत्र बुबुळाचे प्रत्यारोपण करून...
४ हजार १६९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया : इर्विन रूग्णालयाची उत्तम कामगिरी
अमरावती : दृष्टीहिना्च्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागाने नेत्र बुबुळाचे प्रत्यारोपण करून ५२ जणांना दृष्टी दिली. तसेच दृष्टी अधू झालेल्या ४ हजार १६९ रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून उत्तम कामगिरी बजावली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात जिल्ह्याभरातून रुग्ण दाखल केले जातात. यामध्ये वृध्दांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या रूग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्याचे महत्त्वाचे व चांगले कार्य येथील नेत्र विभाग करीत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनात नेत्र विभागाने सन २०१५-१६ मध्ये ८० टक्के उद्दिष्ट्य पूर्र्ण केले असून त्यामध्ये ४ हजार १६९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यातच नेत्रदानाच्या कार्यात हे इर्विन रुग्णालय अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. यंदा १०० नेत्र बुबूळ जमा करण्याचे उद्दिष्ट्य होते. मात्र, १२५ बुबुळे जमा झाली असून त्यापैकी ५२ बुबुळांचे प्रत्योरापण करण्यात आले आहे. नेत्रतज्ज्ञ व्यवहारे, हरिना नेत्रदान समिती व इर्विनमधील समुपदेशन कार्यात नेत्रविभागाने प्रगती केली असून त्याचा लाभ नेत्रहिनांना झाला आहे. एखाद्या अंधाच्या जीवनात उजेडाची किरणे आणण्याच्या दृष्टीने राबविला जाणारा हा उपक्रम सर्वोत्कृष्ट आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सात वर्षांत ३४ हजार ८६४ मोतीबिंदू शस्त्रक्रिया
इर्विनच्या नेत्र विभागाने सात वर्षांत तब्बल ३४ हजार ८६४ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामध्ये २०१०-११ मध्ये ५ हजार ७४३, २०१२ मध्ये ८ हजार ३९५, २०१३ मध्ये ५ हजार १७६, २०१४ मध्ये ५ हजार ४९९, २०१५ मध्ये ४ हजार १६९ व २०१६ या चालू वर्षात २७३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
यांचे कार्य महत्त्वाचे
नेत्रदानासाठी काम करणाऱ्या नेत्रचिकित्सकांनी सन २०१५-१६ मध्ये १२५ आयबॉल गोळा केलेत. यामध्ये भरत गोयनका यांनी ५०, अच्युत ताटे यांनी २४, गायत्री फडणवीस यांनी २२, अमित शिंदे यांनी २२, आडे यांनी ५ व सुवर्णा लांडगे यांनी २ आयबॉल गोळा केले आहेत. या आयबॉलमुळे नेत्रहिनांना दृष्टी मिळाली आहे. यामध्ये नेत्र समुपदेशक म्हणून उध्दव जुकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कार्य करून नेत्रदानाविषयी संबधीत व्यक्तिंना समुदपदेशन केले आहे.
नेत्रदानाविषयी जनजागृती करून अनेक नेत्रहिनांना नेत्र विभागामार्फत दृष्टी मिळाली आहे. नेत्र विभागात काम करणाऱ्या सर्वांनीच प्रयत्न करून उत्तम कामगिरी बजावली आहे.
-नम्रता सोनोने,
जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक.