५.३२ लाख क्विंटल पडून

By Admin | Published: June 3, 2017 12:07 AM2017-06-03T00:07:57+5:302017-06-03T00:07:57+5:30

शासकीय तूर खरेदी केंद्राची ३१ मे रोजी मुदत संपल्याने जिल्ह्यातील १२ केंद्रावरील तूर खरेदी व मोजणीची प्रक्रिया दोन दिवसांपासून ठप्प आहे.

5.32 lakh quintals fall | ५.३२ लाख क्विंटल पडून

५.३२ लाख क्विंटल पडून

googlenewsNext

बाराही तूर खरेदी केंद्र बंदच : २४,६९० शेतकऱ्यांना टोकन, मुदतवाढीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्राची ३१ मे रोजी मुदत संपल्याने जिल्ह्यातील १२ केंद्रावरील तूर खरेदी व मोजणीची प्रक्रिया दोन दिवसांपासून ठप्प आहे. केंद्रीय स्तरावर बैठक सुरू असल्याने शुक्रवारी उशिरापर्यंत आदेश येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही खरेदी पीएसएस योजनेतंर्गत राहण्याची शक्यता आहे.
जिल्यासह राज्यात १० मे पासून केंद्राची पीएसएस योजनेंतर्गत तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र नियोजित एक लाख क्विंटल तूर २६ मे पर्यंत खरेदी झाल्याने त्याच दिवशी पीएसएस योजना बंद करण्यात येऊन राज्य शासनाच्यावतीने बाजार हस्तक्षेप योजना सुरू करण्यात आली. या योजनेची मुदतदेखील ३१ मे रोजी संपल्याने ही तूर खरेदी देखील जिल्ह्यासह राज्यात बंद करण्यात आली. या योजनेंतर्गत ३१ मे पूर्वी २४ हजार ६९० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. या सर्व शेतकऱ्यांची पाच लाख ३१ हजार २४३ क्विंटल तूर मोजणीसाठी शिल्लक आहे. यामध्ये अचलपूर येथील २,२७६ शेतकऱ्यांची ४७,६२६ व्किंटल, अमरावती केंद्रावर ४,३९४ शेतकऱ्यांची १,२३,४५४ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावरील २,५२५ शेतकऱ्यांची ४२,१६७ क्विंटल,चांदूर बाजार केंद्रावरील १,५४६ शेतकऱ्यांची २९,३५० क्विंटल, चांदूर रेल्वे केंद्रावरील १,८५८ शेतकऱ्यांची ३५,६१७ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर ३,३५३ शेतकऱ्यांची ८७,२८६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर १,७६२ शेतकऱ्यांची ३१,७९२ क्विंटल, धारणी केंद्रावर १२७ शेतकऱ्यांची १,६३० क्विंटल, मार्शी केंद्रावर २,२२५ शेतकऱ्यांची ४४,८९२ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २,४४७ शेतकऱ्यांची ४७,९१२ क्विंटल, तिवसा केंद्रावर १,१९२ शेतकऱ्यांची २४,७०० क्विंटल, तसेच वरूड केंद्रावर ९५३ शेतकऱ्यांची १४,९०८क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: 5.32 lakh quintals fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.