५४ हजार आॅनलाईन नोंदणी, १९ हजार शेतकऱ्यांची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:31 PM2018-03-31T22:31:58+5:302018-03-31T22:32:27+5:30
नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा तूर खरेदीचा करारनामा झाला, त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा तूर खरेदीचा करारनामा झाला, त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळेच जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४,७१८ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात १९७४७ शेतकऱ्यांची तीन लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील १२ केंद्रांवर नाफेडद्वारा शासकीय सुरू आहे. गतवर्षी तुरीची सरासरी उत्पादकता हेक्टरी १५ क्विंटल ग्राह्य धरण्यात आली होती. त्यातुलनेत यंदा मात्र १० क्विंटलच ग्राह्य धरण्यात आल्यामुळे अधिक उत्पन्न घेणाºया शेतकºयांवर मात्र अन्याय झाल्याची भावना आहे. आता जिल्हा उत्पादकतेच्या म्हणजेच १२ लाख क्विंटलच्या तुलनेत केवळ चार लाख क्विंटलच तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत डीएमओद्वारा अमरावती, अचलपूर, धारणी ,दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व अंजनगाव सूर्जी येथे तर व्हीसीएमएफद्वारा मोर्शी, वरूड व धामणगाव या केंद्रांवर खरेदी सुरू आहे. दरम्यान सर्वच १२ केंद्रावर तुरीची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. आतापर्यत ५४ हजार ७१८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे यंदा नाफेडच्या केंद्रावर १८ एप्रिल २०१८ पर्यंत तूर खरेदीला मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीचे दिलेले लक्षांक पूर्ण होईतोवर ही खरेदी सुरू राहणार आहे.जर नाफेडकडून तूर खरेदी बंद करण्याचे निर्देश आल्यास केंद्र त्वरित बंद करण्यात येणार आहे. सातबारावर निर्देशित केल्याप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येणार असली तरी एका दिवशी एका शेतकºयांकडून प्रति ५० किलोचे ५० पोत्यांचीच खरेदी करण्याचे आदेश आहेत.
अशी आहे केंद्रनिहाय नोंदणी
सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ८११२, अमरावती ७१६२, अंजनगाव सुर्जी २४८१, चांदूरबाजार ४,०१८, चांदूर रेल्वे ३८१४, दर्यापूर ५३४५, धारणी ७८२, नांदगाव खंडेश्वर ३०५०, तिवसा २१८७, मोर्शी ६३८१, धामणगाव रेल्वे ४७८६ व वरूड तालुक्यात ६५९४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
अशी आहे केंद्रनिहाय खरेदी
सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर २७,८८८ अमरावती ४६६०३, अंजनगाव सुर्जी, १७,५४७ चांदूरबाजार २३५४६, चांदूररेल्वे २३९९५, दर्यापूर ५०३६८, धारणी ७०१२, नांदगाव खंडेश्वर १४,४९७, तिवसा १५६०६ ,धामणगाव २०५२५, मोर्शी ३०२७८ व वरुड तालुक्यात २८८३१ क्विंटल खरेदी करण्यात आली.