दरडोई ५५ लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:00 AM2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:01:18+5:30

केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

55 liters of water per capita | दरडोई ५५ लिटर पाणी

दरडोई ५५ लिटर पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र शासनाचा निर्णय : पाणीपुरवठा योजना सुधारण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२३ पर्यंत ‘हर घर नल से जल’ धोरणाप्रमाणे दरडोई पाणीपुरवठा निकषांत बदल करून ४० लिटरऐवजी ५५ लिटर पाणी घरगुती नळ योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यानुसार सध्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांमध्ये बदल करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्र शासनाचे बदलते धोरण विचारात घेऊन केंद्र शासन व राज्य शासनामार्फत यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील उपांगांचा वापर करून, आवश्यकतेनुसार त्यामध्ये काही बदल करून योजनांची पुन्हा सुधारात्मक जोडणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व वाड्या, वस्त्यांवरील प्रत्येक कुटुंबाला टप्प्याटप्प्याने वैयक्तिक नळाद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यांनी जे वार्षिक कृती आराखडे तयार केले आहेत, त्यात अशा वैयक्तिक नळ जोडणीसाठी सूचना करीत असताना, अस्तित्वातील योजना सक्षम असल्यास पम्पिंग तास वाढविणे, गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या वितरण वाहिन्या वाढविण्यास विविध उपाययोजना सुचविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यता आहे.

घरगुती नळ जोडणीचे दर निश्चित
ग्रामीण पाणीपुरवठा योजनाद्वारे दिल्या जाणाऱ्या नळजोडणीचे दर निश्चित केले आले असून, पीव्हीसी पाईपचा कनेक्शनचा प्रतिजोडणी दर १७२१ रुपये, तर रस्ता ओलांडून नळ द्यावयाचा असल्यास २,६६८ रुपये निश्चित केला आहे. यामध्ये जलमापक (मीटर) चा समावेश करण्यात आलेला नाही.

जलजीवन मिशन अंतर्गत उपक्रमासाठी पाणीपुरवठा विभागाने नियोजन सुरू केले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.
- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

Web Title: 55 liters of water per capita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी