५,५१० संक्रमित ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:19+5:302021-05-31T04:10:19+5:30
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत ५,५१० संक्रमित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यामध्ये १,५८९ रुग्णालयात उपचार घेत आहेत. ४,१७० रुग्ण ग्रामीणमध्ये व ...
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत ५,५१० संक्रमित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यामध्ये १,५८९ रुग्णालयात उपचार घेत आहेत. ४,१७० रुग्ण ग्रामीणमध्ये व १,३४० रुग्ण महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमध्ये असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
---------------------
रविवारी दुपारी रोहिणीच्या सरी (फोटो)
अमरावती : सकाळपासून कडाक्याचे उन्ह तापल्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास १५ मिनिटांपावेतो रोहिणीच्या सरी कोसळल्या. यामुळे अंगाची काहिली करणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला व वातावरणात थंडावा आलेला आहे.
-------------
क्रीडांगणावर संचारबंदीने शुकशुकाट (फोटो)
अमरावती : जिल्ह्यात महिनाभरापासून संचारबंदी असल्याने प्रत्येक क्रीडांगणात शुकशुकाट दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी व सायंकाळच्या वेळी खेळाडूंना सराव करण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी आहे.
----------------
जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
अमरावती : जिल्ह्यात राष्ट्रीय मार्गाची नियमित दुरुस्ती केली जात असताना, अंतर्गत रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. यामधील बहुतांश रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील असल्याने दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
--------------------------
सकाळी ११ नंतरही दुकाने सुरू
अमरावती : जिल्ह्यात सध्या सकाळी ७ ते ११ दरम्यान संचारबंदी जारी करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य मार्केट वगळता अंतर्गत भागातील लहान-मोठी दुकाने ११ नंतरही सुरूच राहत असल्याचे दिसून येते.
---------------------
मजुरांच्या हाताला मिळाले काम
अमरावती : ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीची कामे जोरावर असल्याने आता शेतमजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. लॉकडाऊनच्या काळात काम ठप्प असल्याने या वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
-----------------------
शासकीय कार्यालये होणार सुरू?
अमरावती : कोरोना संसर्गामध्ये आता घट झाली आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कार्यालये ठरावीक कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याबाबत शासनादेशाची प्रतीक्षा आहे.