पदवीधरसाठी ५९.९४ टक्के मतदान
By Admin | Published: February 4, 2017 12:02 AM2017-02-04T00:02:09+5:302017-02-04T00:02:09+5:30
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी जिल्ह्यात ५९.९४ टक्के मतदान झाले.
६ फेब्रुवारीला मतमोजणी : जिल्ह्यात ४५ हजार ९६७ मतदारांनी बजावला हक्क, प्रक्रिया शांततेत
अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी जिल्ह्यात ५९.९४ टक्के मतदान झाले. एकूण ७६ हजार ६८६ मतदारांपैकी ४५ हजार ९६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३० हजार ८५ पुरूष व १५ हजार ८८२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.
पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील ९१ मतदानकेंद्रांमध्ये सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या दोन तासांत मतदानाचा टक्का माघारला. सकाळी १० पर्यंत केवळ ७.९६ टक्के मतदान झाले. यामध्ये ४ हजार ५१५ पुरूष व १ हजार ५८६ स्त्री अशा एकूण ६ हजार १०१ मतदारांनी मतदान केले. नंतर मात्र मतदानाचा टक्का वाढला. दुपारी २ वाजेपर्यंत ३७.७६ टक्के मतदान झाले. यामध्ये १९ हजार ४५८ पुरूष व १ हजार ४९६ स्त्री असे एकूण २८ हजार ९५४ मतदारांनी गर्दी केली. अंतिम वेळेपर्यंत ५९.९४ टक्के मतदान झाले. यामध्ये ६४.८४ पुरूष व ५२.४४ टक्के स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानकेंद्रनिहाय दूरध्वनीवरून मतदानाचीही आकडेवारी घेतली. सायंकाळी मतदान केंद्रावरील पथक येथील विभागीय क्रीडा संकुलातील मतमोजणीस्थळी मतदान साहित्य जमा करण्यास आले असता जिल्हा निवडणूक विभागाद्वारा मतदानाची आकडेवारी घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
मोर्शी तालुक्यात एकूण २ हजार ८९७ मतदारांपैकी एक हजार ९२ पुरूष व एक हजार २५ स्त्री असे एकूण एक हजार ९९९ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ७०.९७ इतकी आहे. चांदूररेल्वे तालुक्यात एक हजार २९१ मतदारापैकी ६५९ पुरूष व ३०७ स्त्री असे एकूण ९६६ मतदारांनी मतदान केले. ही ७४ टक्केवारी आहे. धारणी तालुक्यात ८७९ मतदारांपैकी ५१४ पुरूष व १०२ स्त्री अशा एकूण ६१६ मतदारांनी हक्क बजावला.
जिल्ह्याची टक्केवारी घसरली
अमरावती : ७०.०८ टक्केवारी ठरली. तिवसा येथे ३०३ पुरूष व १०५ स्त्रियांसह एकूण ४०८ मतदान झाले. ही टक्केवारी ७२.९८ टक्के इतकी आहे. मोझरी येथे २४८ पुरूष व १४१ स्त्री असे एकूण ३८९ मतदान झाले. ही ७५.५३ टक्केवारी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ९४४ मतदारांपैकी ४३४ पुरुष, १७४ स्त्री असे एकूण ६०८ मतदान झाले. ही ६४.४ टक्केवारी आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात ८५ टक्के, वरुड येथे ६५.२१ टक्के मतदान झाले. ६ फेब्रुवारीला येथील विभागीय क्रीडा संकुल येथे मतमोजणी होणार आहे
या मतमोजणी केंद्रावर जिल्ह्यासह अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील २८० मतदान केंद्रांवरील मतदान साहित्य जमा करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या निवडणुकीत झालेल्या मतदानात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. मात्र टक्केवारीत जिल्हा विभागात शेवटच्या स्थानी आहे.