अमरावतीत आमदारांसह ६० संक्रमित; एकूण ८५५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:48 PM2020-07-11T20:48:49+5:302020-07-11T20:49:13+5:30

एका ५५ वर्षीय विधानपरिषदेच्या आमदारांसह ६० व्यक्तींचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९८ दिवसांत ८५५ वर पोहोचली आहे.

60 infected with MLAs in Amravati; A total of 855 | अमरावतीत आमदारांसह ६० संक्रमित; एकूण ८५५

अमरावतीत आमदारांसह ६० संक्रमित; एकूण ८५५

Next
ठळक मुद्देरोज सरासरी नऊ व्यक्ती 'पॉझिटिव्ह'


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील एका ५५ वर्षीय विधानपरिषदेच्या आमदारांसह ६० व्यक्तींचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९८ दिवसांत ८५५ वर पोहोचली आहे. या आमदारांची मुंबई हिस्ट्री आहे. सध्या त्यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रोज सरासरी नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहेत.
विद्यापीठाच्या प्रयोगशाळेद्वारा पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील अकोट येथील १२ वर्षीय बालिका, १७ वर्षीय युवक, २२ वर्षीय तरुणीसह ४५ वर्षीय महिला, मांगीलाल प्लॉट येथील ५३ वर्षीय पुरुष व ४८ वर्षीय महिला, कृष्ण नगरातील ३६ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर सोसायटीतील ७८ वर्षीय वृद्ध, राजापेठ बजरंग टेकडी येथील ६३ वर्षीय महिला, शेगाव नाका येथे ३८ वर्षीय महिला व ६५ वर्षीय पुरुष, बडनेरा जुन्या वस्तीत ३६ वर्षीय महिला व ४२ वर्षीय पुरुष, शेगाव नाका येथे १२ वर्षीय बालक, कांतानगरात २ वर्षीय बालकासह ३६ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुष, अशोक नगरात २५ वर्षीय तरुण, २७ वर्षीय महिला व ७० वर्षीय वृद्ध, याशिवाय जिल्हा ग्रामीणमध्ये सातरगाव येथे ३० वर्षीय महिला व परतवाड्याच्या सायमा कॉलनीत १४, १६ व २० वर्षीय तरुण व २१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

दुपारच्या अहवालात बडनेराच्या पवननगरात २५ वर्षीय महिला, रेल्वे क्वार्टर येथील २९ वर्षीय पुरुष, माताफैल येथे २८ व ३३ वर्षीय महिला तसेच कॅम्प येथे ३२, ५२ व ८१ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.सायंकाळचय अहवालात बालाजी मंदीर परिसरात ६८ वर्षीय महिला, नवसारीत ३३ वर्षीय, कंवर नगरात ५० वर्षीय, रोषण नगरात ५५ वर्षीय, गजानन नगरात ३७ वर्षीय , सातुर्णा येथे ३० वर्षीय, सुभाष कॉलनीत ५५ वर्षीय, विजय कॉलनीत ५० वर्षीय, हमालपुऱ्यात २६ वर्षीय पुरुष तसेच ग्रामीणमध्ये तळेगावला ५३ वर्षीय, चांदूर वर्षीय ३५ वर्षीय, कांरजाला ८० वर्षीय पुरुष व दयार्पूर तालुक्यात शिंगणापूर येथे २८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Web Title: 60 infected with MLAs in Amravati; A total of 855

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.