पुणे-मुंबईतील ६०० व्यक्ती येणार स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:00 AM2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:01:02+5:30

ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी केलेल्या किमान नऊ हजार प्रवाशांंना आतापर्यत परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे व मुंबईवरून एका बसमध्ये २६ प्रवाशांंना येण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांसाठी शनिवारी सायंकाळी व बिहार येथे जाण्यासाठी अमरावती येथून रविवारी दुपारी विशेष ट्रेन सुटणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

600 people from Pune-Mumbai will come home | पुणे-मुंबईतील ६०० व्यक्ती येणार स्वगृही

पुणे-मुंबईतील ६०० व्यक्ती येणार स्वगृही

Next
ठळक मुद्दे६०० जणांची आॅनलाईन नोंदणी, जिल्हाधिकाऱ्यांचे विभागीय नियंत्रकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, कामगार व नागरिक कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ‘रेड झोन’ ठरलेल्या पुणे व मुंबई शहरात अडकले आहेत. त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी बसचे नियोजन करण्यासंदर्भात विभागीय नियंत्रकांना पत्र देण्यात आले आहे. येथून जिल्ह्यात परतण्यासाठी ६०० व्यक्तींनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी दिली.
ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी केलेल्या किमान नऊ हजार प्रवाशांंना आतापर्यत परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे व मुंबईवरून एका बसमध्ये २६ प्रवाशांंना येण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांसाठी शनिवारी सायंकाळी व बिहार येथे जाण्यासाठी अमरावती येथून रविवारी दुपारी विशेष ट्रेन सुटणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. नागरिकांना घरपोच सुविधा मिळावी, यासाठी ‘नगर सेतु अ‍ॅप’ व ‘शॉप अ‍ॅप’ कार्यान्वित करण्यात आले आहेत. महापालिकेने त्यांची लिंक नागरिकांना उपलब्ध केली आहे. नागरिकांना किराणा वस्तू, फळे, भाजीपाला तसेच ठोक व चिल्लर जीवनोपयोगी वस्तू आॅनलाइन उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही अ‍ॅॅप विकसित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाची साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. यासाठी सेल्फ क्वारंटाइन हा महत्त्वाचा भाग आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना यंत्रणेवरदेखील मोठा ताण आहे. यामधून त्यांना काही शिथिलता मिळावी, या प्रयत्नांचाच जनता कर्फ्यू हा भाग असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पीडीएमसी’मधील हायरिस्क कोविड रुग्णालयात
बाधितांच्या संपर्कातील काही व्यक्ती डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात आहेत. यामध्ये अतिजोखमीच्या व्यक्तींना तेथून कोविड रुग्णालयातील आयसोलेशन क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात येते, तर ‘लो रिस्क’च्या व्यक्तींवर तेथेच उपचार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. येथील कंटेनमेंंट झोनमध्ये आरोग्य पथकाच्या नियमित भेटी सुरू असल्याचे ते म्हणाले.

सोमवारपासून मोफत बससेवा
खासगी वाहनधारकापासून होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करण्याचा शनिवारी शासनाचा निर्णय घेतला. पुणे, मुंबई कंटेनमेंटधील नागरिकांना या बसने प्रवास करता येणार नाही.

Web Title: 600 people from Pune-Mumbai will come home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.