विद्यापीठात अद्यापही सहा हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:03+5:302020-12-25T04:12:03+5:30

अमरावती : पदव्युत्तर प्रवेशासाठी अवघे सात दिवस शिल्लक असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ...

6,000 students still with 'results' in university | विद्यापीठात अद्यापही सहा हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’

विद्यापीठात अद्यापही सहा हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’

Next

अमरावती : पदव्युत्तर प्रवेशासाठी अवघे सात दिवस शिल्लक असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याची धक्कादायक माहिती आहे. एकूण २१ हजारांपैकी आतापर्यंत १५ हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जुने सत्राची गुणपत्रिका जमा करताच त्याच दिवशी अंतिम सत्राची गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन, ऑफलाईन अंतिम वर्ष परीक्षाचे नियोजन केले होते. त्यानंतर ३ नोव्हेंबरपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र, यंदा निकाल फुगल्याने ‘विथहेल्ड’ निकाल असलेल्या विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. अशातच पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठीदेखील धावाधाव सुरू झाली आहे. महाविद्यालये अथवा

विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अवधी आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेशाची

चिंता लागली आहे.

दरम्यान, अभाविप, एआयएसएफ विद्यार्थी संघटनांनी पदव्युत्तर प्रवेशाच्या जागा आणि प्रवेशाची मुदतवाढ मिळण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना निवेदन सादर केले आहे. आतापर्यंत विद्यापीठाने विज्ञान ९५००, वाणिज्य ४५०० आणि कला शाखा १००० विद्यार्थ्यांचे ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविली आहे.

--------------------

असे आहेत शाखानिहाय ‘विथहेल्ड’ निकाल

वाणिज्य - १२००

विज्ञान - ४३००

कला - ५००

-------------------------

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या जुन्या गुणपत्रिका जमा न केल्यामुळे अंतिम वर्षाचा निकाल रोखण्यात आला आहे. एकंदर २१ हजारांपैकी आतापर्यंत १५ हजार विद्यार्थ्यांची निकालाविषयी समस्या सोडविली आहे. गुणपत्रिका जमा करताच ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या दूर करून त्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका

दिली जात आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

Web Title: 6,000 students still with 'results' in university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.