६१ उमेदवार, ११३ केंद्र, ६८ हजार मतदार
By admin | Published: February 20, 2017 12:06 AM2017-02-20T00:06:10+5:302017-02-20T00:06:10+5:30
२१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून ...
१८ केंद्र संवेदनशील : ११ केंद्र मध्य प्रदेश सीमेवर, २२६ कर्मचारी तैनात
चिखलदरा : २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून ११३ मतदान केंद्रांवर ६८ हजार ३२ मतदार ६१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. त्यासाठी २२६ कर्मचारी तैनात करण्यात आले असून १८ केंद्र संवेदनशील, तर ११ केंद्र मध्यप्रदेश सीमेवर असल्याने त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
चिखलदरा तालुक्याच्या हतरू, सलोना, चिखली, टेंब्रुसोंडा या चार गटांसाठी तर हतरू, चुरणी, काटकुंभ, सलोना, चिखली, खटकाली आणि तेलखार-टेंब्रुसोंडा या एकूण आठ पंचायत समिती गणासाठी २१ फेब्रुवारी रोजी ११३ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाईल. त्यासाठी २२६ कर्मचारी तैनात केले असून ६८,२२८ मतदार आपल्या मतांचा अधिकार करणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
६१ उमेदवार रिंणगात
तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांसाठी २२, तर आठ पंचायत समिती गणांसाठी ३९ असे एकूण ६१ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय टेंब्रुसोंडा व हतरू गटात सर्वाधिक प्रत्येक सात, तर चिखली व सलोना गटात प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समिती गणात तेलखार, चिखली व खटकाली गणात प्रत्येकी सहा उमेदवार हतरू, टेंब्रुसोंडा गणात प्रत्येकी पाच, काटकुंभ, चुरणी गणात प्रत्येकी चार, तर सर्वात कमी सलोना गणात तीन उमेदवार रिंगणात आहेत.
१८ केंद्र संवेदनशील, ११ सीमेवर
राज्यात कमी लोकसंख्या मात्र क्षेत्रफळात चिखलदरा तालुक्याचे वर्णन करण्यात आले आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम आदिवासी भाग असल्याने येथे संवाद साधने कठीण आहे. मागील काही निवडणुकीचा अनुभव पाहता प्रशासनाने १८ केंद्र संवेदनशील यादीत ठेवले आहे, तर ११ मध्यप्रदेश सीमेवरील केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.